Hard Copy Price:
25% OFF R 100R 75
/ $
0.96
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
सुजाता खुप छान कविता लिहतेस तू. मला खुप आवडल्या.तुला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.
Megha Nibandhe
21 Aug 2021 03 25 PM
सुजाता तुझा काव्यसंग्रह वाचला. खुप छान कविता केल्या आहेस. तुझी कल्पना शक्ती छानच आणि ती लेखनात उतरवण्याची प्रतिभाही मस्त.माझा आली वाचायला अशाच चां चां कविता तू लिही .तुझ्या पुढच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा.
मेघा निबंधे
वृंदा कुलकर्णी
14 Aug 2021 12 47 PM
सुजाता ,
तुझा "निळ्या उजेडात" हा काव्यसंग्रह वाचताना माझी नवनवीन शब्दांशी ओळख आणि मैत्री झाली..
जुनी सावळी वाट , अक्षर काळजाचे घुंगरू , सुरांची रेघ,निळ्या उजेडातील उभ्या किरणांच्या हाका ..असे कितीतरी नवीन शब्दं वाचले आणि कवितेतून अनुभवलेही..
तुझ्या कवितेतील प्रत्येक शब्दं भावपूर्ण , संवेदनशील आहे. तुझ्या कविता , तुझे शब्दं असेच बहरत राहो यासाठी मनापासून शुभेच्छा.. आणि तुझ्या पहिल्या काव्यसंग्रहासाठी तुझे खूप खूप अभिनंदन...!
वृंदा कुलकर्णी.
पुणे.
रसिका राजीव हिंगे
11 Aug 2021 10 56 PM
रसिका हिंगे
सुजाता! या शब्दचा अर्थ आहे चांगल्या जातीचे म्हणजे चांगल्या प्रतीचे. जिच्याजवळ प्रतिभा आहे अशी सुजाता असाही अर्थ आहे.
निळ्या उजेडात हा काव्यसंग्रह वाचतांना याचे प्रत्यंतर आले.
भावगर्भ, आशयघन रचना हा काव्य लिखाणातील महत्वाचा भाग आहे. गझल असो अथवा मुक्तछंद असो किंवा वृत्तबद्ध कविता प्रत्येक ठिकाणी याचा अनुभव येतो.
वाचकाला खिळवून ठेवण्याची प्रतिभा शक्ती , अफाट शब्द भांडार आणि हळवं मन म्हणजे हा काव्यसंग्रह.
असेच न थांबता एकामागे एक काव्यसंग्रह प्रकाशित व्हावे आणि सगळ्या काव्यरसिकांना ही साहित्य मेजवानी लाभावी ह्या शुभेच्छा
Deokisan Sarada
09 Aug 2021 03 02 PM
कवयित्री सुजाता तुझा निळ्या उजेडात कविता संग्रह मनापासून वाचला. पुस्तकाच्या मुखपृष्ठापासूनच त्यातली सौंदर्यदृष्टी जाणवू लागली. निळ्या रंगाच्या मोरपिसाने आतल्या शब्दकळेचा रेशमी पोत दर्शनीच सांगितला. संवेदना प्रकाशनाच्या संवेदनशिलतेचं दर्शन घडलं. सुजाता तुझ्याकडे उत्तम शब्दसंचय आहे. मुक्तछंद आणि सम्यक कविता दोन्ही साधण्याचा प्रयास स्तुत्य आहे. तुझ्या मनाला गर्द पालवीचा बहर येतो आणि अखंड चैतन्याचा आविष्कार सळसळतो. तुझ्या कविता धुक्यात लपलेल्या दृश्यासारख्या वाटतात. ह्या संग्रहातील बहुदा कविता 'स्वान्त: सुखाय' लिहिल्या असाव्या असे वाटते. परंतु कुठल्याही कवितेला लोकप्रियतेची ओढ ही असतेच. तेव्हा त्यांना विषय आणि दिशा दिली तर नक्कीच त्या लोकप्रिय होतील असे वाटते. कवितेचा शोध हा आपण आपला घेतलेला शोध असतो.
ह्या निळ्या प्रवासासाठी तुला खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद.
Sunil Deshpande
10 Jul 2021 08 28 PM
'निळ्या उजेडात'ल्या लख्ख आणि गेय कविता वाचतो आहे.
छानच आहेत. अर्थनिमग्न आहेत.
वाचतांना, पुढची ओढीने वाचाविसी वाटते, हे संग्रहाचे भावबळ आहे.
Veena Malshe
07 Jul 2021 10 33 PM
सुजाताची कविता मनात रंग,रस आशयाचे मोहक अगणित तरंग निर्माण करते.जाणवले की, मैफिलीत टाळ्या घेणारी ही कविता नव्हे. एका बैठकीत वाचून मनःपटलावर थुईथुई नाचून, कौतुकाची थबुकली मिळवून शांत होणारी! ही कविता आहे गहन संवादी.ती मौनाच्या गाभाऱ्यात वाचकांना उतरायला लावणारी आहे. ती संवादी आहे, आणि हा संवाद शब्दांचे सुंदर,सुंदर भावलेणे घेऊन येणारा आहे. तो कधी आपल्याशी आहे. तर कधी आत्मसंवाद आहे.तर कधी एक आत्मशोध आहे.
सुजाताच्या कवितेत शब्दांचा उत्सव आहे. तिच्या शब्दांना नाद, गंध रंग, स्पर्श, सुखद, दुःखद, उदास, अश्या अगणित भाव रम्य छटा आहेत. ज्या आपले मन व्यापून टाकतात.
सुजाताच्या बऱ्याच कवितांमध्ये वेगवेगळे कडवे, वेगवेगळा पण खूप गहन चिंतनीय आशय घेऊन येतात. आणि तरीही ती कविता एका आकृतिबंधात व्यवस्थित बांधल्या जाते. पण म्हणूनच ती मैफलीत ऐकून समजण्यातली नाही. ती वाचून मनोनीत करून, तिचा भावार्थ आकळुन घेण्याचे गोड दायित्व वाचकांना निभवाय चे आहे.आणि काव्यप्रेमी रसिकास ह्या पुष्करणीत विहार करायला नक्कीच आवडेल. मीच माझ्या एका कवितेच्या शेवटच्या ओळीत असे म्हटलेय की कविता अशीच असते ब्रम्हांडाला कवेत घेणारी.
रोहित आहेर
05 Jul 2021 05 35 PM
अतिशय सुंदर कविता आहे सर्वच. एकदा वाचायला घेतलं कि पुस्तकं लवकर सोडायची इच्छा होतं नाही... इतक्या सहज आणि सुंदर कविता आहे
Swati lele
04 Jul 2021 07 58 PM
सुजाता चा निळ्या उजेडात हा पहिला कवितासंग्रह वाचताना प्रत्येक कवितेतून कवयित्रीची प्रतिभा जाणवते. मुखपृष्ठावरील मोरपिसाप्रमाणे अनेक छटा असलेल्या कवितांशी तिचे गूढ नाते उद्धृत करते.
सुंदर छपाई आणि आकर्षक मुखपृष्ठासाठी प्रकाशकांचे अभिनंदन!!
सुजाता, आगामी कविता संग्रहांसाठी खूप खूप शुभेच्छा!!!
Mukta Santosh Kulkarni
02 Jul 2021 12 38 AM
सुजाताचा कवितासंग्रह "निळ्या उजेडात"वाचून पूर्ण झाला... खूप सुंदर कवितांचा खजिना आहे...सौ साधना ताई यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेत म्हंटल्याप्रमाणे "काही कविता वाचताना काव्याचे रसग्रहण करावे की शब्दांच्या अर्थाच्या भावामध्ये हरवून जावे असे वाटत राहते"...हे अगदी खरे आहे..प्रत्येक कवितेतून तिची प्रतिभा दिसते...खूप सुंदर रचना आहेत तिच्या...आकर्षक मुखपृष्ठ,सुंदर मांडणी आहे पुस्तकाची..सर्वांनी जरूर वाचावा/संग्रही ठेवावा असा हा काव्यसंग्रह आहे "निळ्या उजेडात"👌👍
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सुजाता💐
Ishwar Murukate
29 Jun 2021 08 27 PM
कविता खूप छान लिहिल्या आहेत. छपाई , मुखपृष्ठ पुस्तक बांधणी छान आहे . कविता खूप आवडल्या.
Mohan Kardiwal
29 Jun 2021 07 31 PM
सुजाता जी
आत्ता पर्यंत मी 23 कविता वाचन केल्या.
खूपच
सुरेख
अप्रतिम
छान
आनि मस्त कविता आहे
आपण खूपच प्रतिभावंत आहेत
एक एक कविता लाख मोलाची आहे
आनि हो अनमोल कविता आहे
डॉ. जयंत गुजराथी यांनी जे लिहिले आहे यातून आपण महान कवयित्री आहे हे सिद्ध होते
निळया उजेडात कविता वाचणं करताना वाचक नक्कीच जातो हे या कवीताचे वैशिष्टय़ आहे
Avinash Chinchwadkar
28 Jun 2021 10 20 PM
या पुस्तकातील कविता वाचल्या आणि खूप आवडल्यात. खूप वेगळ्या कविता आहेत. मुख्य म्हणजे निसर्ग आणि आपण, या विषयावर आधारित आहेत. अशा प्रकारच्या कविता खूप कमीच लिहिल्या जातात! मनःपुर्वक अभिनंदन! अजून बा.भ., शांताबाई, इंदिरा संत यांच्या कविता वाचाव्यात 👍🙏
Sujata
26 Jun 2021 12 10 AM
संवेदना प्रकाशनाचे प्रकाशक श्री. नितीन हिरवे आणि टीम यांनी मुखपृष्ठ कव्हर फार सुंदर केले, उत्कृष्ट पानांचा दर्जा आणि बांधणी केली. फार आभारी आहे आणि खुप शुभेच्छा 🙏💐
सौ वर्षा तुपे
24 Jun 2021 05 37 PM
सुजाता तुझी प्रत्येक कविता अर्थमय, अगदी खोलात शिरायला लावणारी, फिरून फिरून वाचतानाही फिरून टवटवीत रंग रंगी भावनांतून अलवार एकांतावर जरतारी स्पंदनांवर विराजमान होणारी, एका गुढ विश्वातून प्रसवलेली जणु तेवणारी सांजवात ,
खुपच मस्त, तुला पुढील वाटचालीसाठी माझ्या खुप खुप शुभकामना
Tushar
23 Jun 2021 10 43 PM
खुपच सुंदर कविता,आकर्षक मुखपृष्ठ,आणि शिर्षक देखील
सर्वच कविता खुप वेगळ्या उंच क्षितीजावर घेऊन जातात.
सुजाताजी भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा
Aditi Harer
23 Jun 2021 07 24 PM
The book is simply amazing and I absolutely love the way how every poem teaches me something new and brings me a bit closer to my mother tongue! I'm surely going to recommend this book for everyone, this book is very close to my heart and I'm in love with it!!
विनिता धुपकर
23 Jun 2021 10 53 AM
अप्रतिम कविता संग्रह...! उत्कृष्ठ मुखपृष्ठ.. निळाई आणि मोरपिसातून आपण कविता वाचता वाचता एका वेगळ्या काव्य दुनियेत रममाण होतो. सुरेख मांडणी, कल्पनांची उंच झेप, तसेच खोलवर रूजलेली संस्कृती याचे यथार्थ चित्रण आणि त्यात झुलणारे शब्द..! प्रत्येकाने आवर्जून वाचावे असे...!
Anjali Rajadhyaksha
23 Jun 2021 10 46 AM
कवीमनाच्या व संवेदनशील व्यक्तीस निश्चित आवडेल असा काव्य संग्रह आहे..निसर्ग चित्रणही उत्तम.. Printing व binding खुप छान. निळाई ने नटलेला काव्यसंग्रह...
अशाच नवनवीन काव्यसंग्रहाची अपेक्षा आहे. शुभेच्छा !!!
मंजिरी देव
23 Jun 2021 08 58 AM
पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत अतिशय सुंदर लेखन,
सुजाताच्या पुढील कवितेच्या पुस्तकाची आतुरतेने वाट पहात आहे..
अनेक शुभेच्छा सुजाता
सौ मंजिरी देव