Summary of the Book
संवेदनशील जिज्ञासू पत्रकार त्याच्या आयुष्यक्रमात त्याला सामोर्या आलेल्या सर्वसामान्य जीवनातूनही मोती टिपत जातो. भारत गजेंद्रगडकर यांनी, त्यांना पत्रकारितेच्या जीवनात भेटलेल्या माणसांकडून चांगुलपणा, उपक्रमशीलता, बुद्धीसंशोधनाची हाक
असे चांगले-चांगले गुण टिपले आणि ते विविध वर्तमानपत्रांच्या माध्यमातून लोकांसमोर परिचय लेखांच्या स्वरूपात मांडले. येथे सादर केले आहेत त्यांच्या अशा महत्वाच्या लेखांचे संकलन...