Summary of the Book
स्त्री कशी आहे? स्त्री कशी असेल?
पत्नी आणि माता या तिच्या महत्त्वाच्या भूमिकांकडे दुर्लक्ष न करता ती त्या समर्थपणे पार पाडेल पण त्याचबरोबर ती तिच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याची जपणूक करणारी असेल. ती समाजहितकर्ती आहे. ती कुटुंबकल्याणकर्ती आहे, सृष्टीसृजनाचे कार्य ती प्रभावीपणे करेल. स्वरक्षणासाठी ती सबळ आहे. अन्यायाचा प्रतिकार करताना सामर्थ्यशाली, धीरोदात्त आहे. आपल्काली भयंकर रूप धारण करणारी आहे. ती सृजनात्मक आहे. तसेच तिच्यात भंजनाचे सामर्थ्यही आहे.
हे जग तिचे आहे. तिने निर्माण केलेले आहे. मी सन्मानाने जगेन, सर्व शक्तीनिशी आणि बुद्धिसंपन्नतेने जगेन हा तिचा बाणा आहे. आणि म्हणून ती नव्या युगाची युगंधरा आहे.
स्त्रीचा इतिहास आणि मानवी समाजव्यवस्थेमधले तिचे योगदान याचा वेधक शैलीत आढावा घेणारे `आदिशक्ती’ हे पुस्तक तिच्या उद्याच्या जीवनाचा आत्मविश्र्वास वाढविणारे आहे.