Summary of the Book
भारतीय क्रांतीकारकांची स्फूर्तीदेवता म्हणून गौरविली गेलेली झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचे हे रोमांचकारी चरित्र. झाशीसारख्या मोठ्या संस्थानची राणी, अकाली वैधव्य, इंग्रजांच्या कावेबाजपणावर मात करणारी बुद्धिमान स्त्री आणी रणांगणावर अतुलनीय शौर्य गाजविणारी रणरागिणी ही तिची अनेक रूपे लेखिका प्रतिभा रानडे यांनी समोर आणली आहेत. झाशीच्या पूर्वेतिहासापासून पुस्तकाची सुरवात होते. मनू ते राणी लक्ष्मीबाई हा प्रवास, युद्धाचे घटनाचक्र, स्वातंत्र्यासाठी शर्थ या प्रकरणातून क्रमाक्रमाने राणी लक्ष्मीबाईचे चरित्र उलगडत जाते. झाशीला प्रत्यक्ष भेट, चर्चा, अभ्यास आणि संशोधनातून हे रसाळ चरित्र आकाराला आले आहे.