कवितेचं रसग्रहण हा रसिकांच्या अत्यंत जिज्ञासेचा विषय. कवितेचे अंतरंग उलगडून दाखवणं आणि स्वतःसाठीही ते उलघडणं हे आनंददायी असतं. हाच अनुभव वाचकांना पडद्यामागाचं गाणं हे पुस्तक वाचताना येऊ शकतो. लोकांच्या मनात बिंबलेली, वर्षानुवर्षं ओठांवर रुळलेली गाणी आहेत ही.
तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, वो शाम कुछ अजब थी, धुंदी कळ्यांना अशी. अगदी ओळखीची. पण या गीतांची एक वेगळी ओळख लेखिका अजिता सोने- सोनोले आपल्याला करून देतात. या गाण्यांमधला भावार्थ शोधण्याचं आनंददायी तरीही कठीण काम अजिता सोने यांनी केलं आहे. जोडीला वापरलेले फोटो त्या त्या काळात वाचकाला घेऊन जातात.
‘पडद्यामागचं गाणं’ या पुस्तकाचा परिचय वाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर...
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5327128645681164461