Summary of the Book
‘लोकसत्ता’च्या ‘जगप्रवाह’ सदरातील निवडक लेख एकत्रितपणे जयराज साळगावकरांच्या याच नावाच्या पुस्तकात वाचायला मिळतात. २००६ साली हे लेख लिहिले गेले आहेत. त्यातील आकडेवारी, अन्य माहिती जरी चार-पाच वर्षांपूर्वीची असली तरी चिकित्सक वाचकाला त्यातलं विचारधन नक्कीच उपयुक्त आणि सध्याच्या काळातही समर्पक वाटेल. अर्थशास्त्र, सामाजिक अर्थकारण, मार्केटिंग, प्रसारमाध्यमे, इंटरनेट, समाजशास्त्र, शिक्षणक्षेत्र, शेतीसंबंधित नवं तंत्रज्ञान- असे विविध विषय जागतिकीकरणाचं भान ठेवून फारसे विस्तारपूर्वक नसले तरी अभ्यासू वृत्तीने लिहिले असल्याचं जाणवतं.. जागोजागी दिलेली आकडेवारीदेखील खूप बोलकी आहे.