Hard Copy Price:
25% OFF R 250R 187
/ $
2.40
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
सावित्रीबाई फुले या स्त्रीबद्दल आम्हां सर्व स्त्रियांना अपार आदर वाटतो. त्या 'तेव्हा' होत्या म्हणून 'आज' आम्ही आहोत. सावित्रीबाई, आनंदीबाई जोशी, ताराबाई मोडक, कमलाबाई होस्पेट, अनुताई वाघ... किती नंदादीप उजळेल, नि आमचे शिकणे सोपे झाले. अशा १५ स्त्रियांच्या कर्तृत्वाचा आलेख त्यांच्या शब्दात मांडण्याचा एक आगळावेगळा प्रसन्न उपक्रम म्हणजे 'उजळले स्मृतींचे दिवे' हे नितांत सुंदर पुस्तक. त्या स्त्रिया स्वतःच आपल्याशी बोलत असल्याने यात मृत्यू नाही. आहे ते जिचे तिचे 'बोलके' काम. 'सारा कर्तृत्वाचा बहर सारा जाणिवांचा मोहर हा तर स्त्रीत्वाचा फुल्लोर पोचली आकाशी गल्लोर' जमिनीवर पाय ठेवून आकाशाला भिडणाऱ्या या स्त्रियांचा बोलकं करणारी स्त्रीही तेवढीच मातब्बर. मुक्ता केणेकर या ज्येष्ठ साहित्यिका जेव्हा या 'आसमानी' शब्दचित्रांना बोलकं करतात, तेव्हा शब्दप्रवास कर्तृत्वाइतकाच लखलखीत होतो. मुक्ता केणेकर माझ्या अतिशय आवडत्या लेखिका आहेत. मी जे लिहित आहे, त्यात इवलीशी अतिशयोक्ती नाही. पुस्तक एकदा हाती घ्याल तर ते वाचल्याशिवाय खाली ठेवणार नाही, एवढी मी खात्री देते. माझेही तसेच झाले बरं!