Summary of the Book
मुलांच्या संगोपनात आई- वडिलांचे महत्त्व समान असते. पण वडिलांवरील प्रेम व्यक्त करण्यात येत नाही. हे अव्यक्त प्रेम समोर यावे, त्यातही मुलगी व वडिलांचे नाते उलगडावे, असा प्रयत्न नंदिनी म्हाडेश्वर यांनी 'संवाद बापलेकींचा ' मधून केला आहे.
राजकारण, समाजकारण, प्रशासन, नायालय, दिग्दर्शन, संशोधन आदी क्षेत्रांतील मान्यवर व त्यांच्या मुलींमधील संवाद यात आहे. मुली व पत्नीला सन्मानाने वागविणाऱ्या पित्याचा अभिमान गीता नारळीकर यांना जयंत नारळीकर यांच्याबाबत वाटतो.
प्रशासकीय सेवेत असताना गैरकारभाराविरोधात ठामपणे उभे राहिलेले गो. रा. खैरनार यांनी त्या काळात खंबीरपणे मागे उभी राहिलेल्या संगीताबद्दल मनोगत व्यक्त केले आहे. गोपीनाथ मुंडे व पंकजा मुंडे - पालवे, सुरेश व सोनिया खरे, राजदत्त व भक्ती, डॉ. डी. वाय. पाटील व नंदिता पाटील - पालशेतकर, डॉ. अरुण फिरोदिया - सुलज्जा फिरोदिया -मोटवानी,
अॅड. उज्ज्वल निकम - शर्वरी निकम, डॉ. सु. म. पाटील - नीरजा पाटील, डॉ. सुधीर निरगुडकर - मंजिरी निरगुडकर, बाळकृष्ण रेणके - पल्लवी रेणके, डॉ. गिरीश जाखोटिया - शरयू जाखोटिया, नानिक रूपानी - रिना रूपानी, अब्दुल कादर मुकादम - मोहसीना मुकादम, जॉर्ज मिनेझिस - अंजली मिनेझिस या बापलेकींचा संवाद यात पत्ररूपाने आहे.