Summary of the Book
खुळखुळा खेळणं...
रडणाऱ्याला हसवणारं.
तसा हा शब्दांचा
पुस्तकरूपी खुळखुळा.
आपल्याच मनातील विषय.
पाहिलेले, अनुभवलेले.
सभोवतालची माणसं,
दिसलेली, भेटलेली.
फरक आहे तो तुमच्या माझ्या
पाहण्यातला, व्यक्त होण्यातला
मी गांभीर्याने पाहतो आणि
तिरकस लिहितो.
उद्देश, फारसं मनावर घ्यायचं नाही.
डोक्याला ताप नको.
तुम्हांला वाचतानाही ते जाणवेल,
किंचित हसूही येईल कारण हे
शाब्दिक व्यंगचित्र आहे.
वाचा आणि हसा...