Hard Copy Price:
10% OFF R 280R 252
/ $
3.23
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
25% OFFR 280R
210
/ $
2.69
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
भारतीय तत्त्वज्ञानामध्ये “नाम” ह्या शब्दाला एक विशिष्ट स्थान आहे. ईश्वर किंवा सद्गुरुंचे नाम म्हणजे साक्षात एक कल्पवृक्ष होय. नाम म्हणजे एक श्रेष्ठ भवतारण नौका आहे. “नाम साधन पैं सोपे”( नाम साधनेतील अध्यात्म आणि विज्ञान ) हे पुस्तक नुकतेच माझ्या वाचनात आले. विशेष म्हणजे, ह्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच ११ जुलै २०२१ ह्या दिवशी प.प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज ह्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने झाले. प्रथितयश विवेचक परमपूज्य सद्गुरु ब्रह्मलीन श्री बापट गुरुजी ह्यांनी नामसाधनेतील तत्त्वज्ञान आणि विज्ञानाधीष्ठित विविध पैलू उलगडताना जी विविध विवेचने केली ती प्रस्तुत पुस्तकाच्या माध्यमातून संकलित करण्यात आली आहेत. अगदी सामान्यांना समजतील अशी दैनंदिन जीवनातली सोपी उदाहरणे, उद्बोधक गोष्टी, प्रवाही मांडणी ह्या वैशिष्ट्यांमुळे पुस्तक संग्राह्य झाले आहे. ग्रंथाची मांडणी छोट्या छोट्या लेख स्वरूपात आहे, जेणेकरून दैनंदिन लेख वाचनातूनही सामान्य साधकाला नाम-मार्ग चालत राहण्यास, नाम-अनुसंधान ठेवण्यास प्रेरणा मिळत राहील.इच्छुक वाचक-साधकांनी ह्याचा जरूर लाभ घ्यावा.