Summary of the Book
‘सातमाईंचे रान’ ही एक अशी अद्भुत कादंबरी आहे, की ही कादंबरी लिहिणार्या मला त्या वेळी ह्या सातमाईंच्या जागृत अस्तित्वाबद्दल काहीही कल्पना नव्हती. त्या वेळी मी अमेरिकेत होते. एका बर्फाने गारठलेल्या रात्री ह्या सातमाईंचे प्रत्यक्ष अस्तित्व माझ्याजवळ मी अनुभवणे आणि नंतर माझे झपाटल्यासारखे लिहितच राहणे म्हणजे ही सातमाईंची कादंबरी आहे.
ह्या कादंबरीत मी अनेक पात्रे गुंफली आहेत. तसेच ह्या सर्व पात्रांच्या वेगवेगळ्या भावना, आजीची माया, एका आईचे वेडे वात्सल्य, कुणाचे क्रौर्य तर कुणाचा शृंगार हे सर्व ह्या कादंबरीत आले आहे. ज्या वेळी खोताच्या अंबाआजीचा मृत्यू होतो, तेव्हा सर्व मांजरीवाडीतील गावकर्यांना ह्या खोताच्या सातमाईंचे व खोताच्या त्या झपाट्याचे प्रत्यक्ष सत्यदर्शन होणे, ह्या सर्व सत्य वास्तवाचे प्रतिबिंब म्हणजेच ही ‘सातमाईंचे रान’ कादंबरी आहे. माझी स्वत:ची ह्या जागृत देवस्वरूप सातमाईंवर नितांत विश्वास, श्रद्धा आहे कारण...
जिथे श्रद्धा आहे, तिथे विश्वास आहे.
जिथे विश्वास आहे, तिथे सातमाई आहेत.
आणि जिथे सातमाई आहेत,
तिथे काहीही घडू शकते!