Hard Copy Price:
25% OFF R 430R 322
/ $
4.13
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
ही कथा एका जिद्दी, अभ्यासू, आणि संवेदनशील तरुणाच्या जीवनप्रवासाची आहे - ज्याने प्रतिकूल परिस्थितीतूनही स्वतःचा मार्ग स्वतःच निर्माण केला. वडिलांचे व्यसन, घरातील आर्थिक अडचणी, आणि समाजाचे दडपण या सगळ्याचा सामना करत त्याच्या आईने जे कष्ट घेतले, ती जाणीव आणि त्यामागचा त्याग वाचकांच्या मनाला निश्चितच स्पर्शन जातो.
बालपणापासूनच शिक्षणासाठी जिद्द ठेवणाऱ्या या मुलाने केवळ शैक्षणिक यश मिळवले नाही, तर त्याच्या वाचनाची आवड, सामाजिक जाणिवा, आणि कामाच्या क्षेत्रातील प्रगती यामुळे तो एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरतो. शालेय जीवनातच समाजकार्याची बीजे रोवणारा हा मुलगा, पुढे एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत जबाबदारीची भूमिका पार पाडतो - ही गोष्ट आजच्या पिढीला एक सकारात्मक संदेश देते.
लेखकाने ही कथा अत्यंत संवेदनशीलतेने, वास्तवदर्शी शैलीत मांडली आहे. वाचकांना ही कथा एका सामान्य घरातील मुलाच्या असामान्य प्रवासाची साक्ष देणारी वाटते.
एकूणच ही गोष्ट संघर्ष, जिद्द, आईचं मोल, आणि समाजाप्रती जबाबदारी यांची सुंदर सांगड घालणारी आहे. अशा कथा वाचकांना नवसंजीवनी देतात आणि आपल्याला आयुष्यातील अडचणींवर मात करण्याचं बळ देतात.
पटयारा ही नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारी कहाणी आहे. ती वाचताना मन हेलावून जातं, पण शेवटी एक सकारात्मक ऊर्जा घेऊन वाचक पुढे जातो. लेखकाची लेखनशैली ही वास्तवाला भिडणारी आणि थेट मनात उतरते अशी आहे!
#PATYARA #पटयारा
मिनाक्षी नलावडे
31 Jul 2025 06 30 PM
शाळेतील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मराठी वाचन फार झाले नाही, मात्र ‘पटयारा’ वाचायला सुरू केले आणि हयातली भाषा ही सहजसुंदर आणि प्रभावी असल्याचे प्रकर्षाने जाणवले.
मराठीच्या नेहमीच्या वाचकांपेक्षा मला थोडा अधिक वेळ लागला, पण रोजच्या वाचनाचे सातत्य राखत मी दोन तीन आठवड्यात हे पुस्तक वाचून संपवले.
मराठीशी नाळ जोडलेली राहावी असं मनापासून वाटणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ‘पटयारा’ सारखं पुस्तक एक संजीवनी म्हणून काम करेल हे नक्की!
‘पटयारा’ वाचून संपवलं आणि मी बराच वेळ भारावलेल्या अवस्थेत होते. पुस्तकातला प्रत्येक क्षण वाचकाला खिळवून ठेवत जगण्याचा अनुभव देत राहतं. एकूण एक पात्र नावानिशी लक्षात राहावीत अशी पुस्तकात उतरली आहेत.
संतोषच्या लहानपणापासून ते युवा अवस्थे पर्यंतची जडणघडण अनुभवतांना खूप अभिमान वाटतो. प्रचंड अडचणी आणि आव्हानांना न जुमानता संतोषचा प्रामाणिकपणा, सचोटी आणि नम्रपणा अविश्वसनीय आहे.
पुस्तक वाचून झाल्यावर हा अभिमान अधिकच दुणावतो!
संतोष आणि त्याच्या आईच्या जिद्दीला खरंच सलाम आणि त्याच्या कुटुंबाला लाख लाख शुभेच्छा!
- मिनाक्षी नलावडे, शिवाजी नगर, पुणे
Arpita Shah
21 Jul 2025 06 02 PM
A book that ignites a spark within you, teaches you to embrace the challenge life throws at you and that too with a smile, reminds you to be kind with people who are struggling to earn livelihood, keep fighting even when life takes away something you earned after tons of sacrifices..
The author, Santosh, is my colleague but I never imagined the hardship he went through. I had seen the successful and jolly side of this person. Through this book I saw the hustling behind his success and smile today and I am more than impressed. It may be easy to write about good things but writing about vulnerable side of self, that needs immense courage.
In today’s generation where we are hooked to screens, taking a break to read this book would be worth it. And you know the best part, the author has written this book in such a smooth fashion that most of the chapter ends with some suspense, wanting the reader to start the next chapter and know what happens next.. amazing!!
After completing the book, I consider myself more fortunate to be the first one to get signed copy of this book. 🙏
Dr. Abhijeet Vaidya
11 Jul 2025 05 23 PM
प्रिय संतोष नागो शिंदे,
पट्यारा’ वाचले आणि स्तिमित झालो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीने मात करणारी तुमच्या आयुष्याची विलक्षण कहाणी मराठी भाषेतील आत्मचरित्र या वाड्मय प्रकाराला एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवेल.
हे आत्मकथन पारदर्शक, नितळ आणि प्रामाणिक आहे. प्रतिकूल आयुष्याशी तुम्ही, तुमची तितकीच विलक्षण आई आणि आजी यांनी केलेला संघर्ष, तुमच्या वडिलांनी कुटुंबाबद्दल एक हळुवार कोपरा जपत आपल्या दारूच्या व्यसनाशी केलेला संघर्ष या सर्वांबरोबर मला तुम्ही ज्ञान संपादनासाठी, आपल्याच वैचारिक घडणीसाठी केलेला संघर्ष अधिक जगावेगळा वाटतो. हा संघर्ष अनेक विचारधारांच्या वाटा शोधत गांधी आणि आंबेडकर यांच्यापाशी येवून थांबतो.
शहरातील उच्चवर्णीय, आर्थिक दृष्ट्या संपन्न आणि शिक्षणाची परंपरा लाभलेल्या कुटुंबातील मुले ज्या पुस्तकांच्या वाटेलही जात नाहीत तेथे संतोष नागो शिंदे नावाचा मुलगा केवळ मराठीच नाही तर इंग्रजी पुस्तके झपाटून वाचत रहातो. ती वाचत डोळसपणे त्यांची चिकित्सा करीत घडत रहातो हे फार वेगळे आहे. यालाच गौतम बुद्धांच्या भाषेत ‘अत्त दीप भव’, ‘तुझ्या अंतरीचा दिवा लाव’, म्हणतात. हा ज्ञानाचा आणि त्या ज्ञानाच्या चिकित्सेचा दीप आहे. म्हणूनच धुळ्यात एका गरीब, चतुर्थ श्रेणी कामगाराच्या पोटी जन्म घेतलेल्या संतोष शिंदेचा प्रवास, शिकण्यासाठी वाट्टेल ते कष्ट उपसित, उच्चशिक्षण घेवून बहुराष्ट्रीय कंपनीत पोहोचण्यापर्यंतच नुसता होत नाही तर गांधी आणि आंबेडकर यांची सांगड घालण्या पर्यंत होतो. भल्या भल्यांच्या आयुष्याची गाडी या मुक्कामी पोहोचत नसते.
तुमच्यात एक उत्तम साहित्यिकही दडलेला आहे.
भावी आयुष्यासाठी आणि वाड्मयीन वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!
आपला,
डॉ. अभिजित वैद्य
Devyani Dinesh Deshmukh
24 May 2025 02 46 PM
कठीण प्रसंग माणसाला खऱ्या अर्थाने अजोड बनवतात!
तुमचा प्रेरणादायी जीवनप्रवास प्रत्येकाच्या हृदयाला भिडतो!तुमची जिद्द चिकाटी आणी मेहनत वाखण्या जोगी आहे
हे पुस्तक सांगतं की अखंड मेहनत आणि अपयशातून मिळालेले धडे यशाचा सोनेरी मार्ग प्रशस्त करतात.आपला दृष्टिकोन पुढील पिढिस मार्गदर्शक ठरो ही स्वामी चरणी प्रार्थना स्वामी आपणास पुढील आयुष्यात असेच यश मिळवून देवो 🙏🏼
देवयानी दिनेश देशमुख
Dinesh S.Deshmukh
24 May 2025 01 24 PM
पट्टयारा......
पुस्तक वाचताना एक विचार आला जो मी माझ्या शैली मध्ये मांडतोय..
संतोष च्या बाबांनी जर स्वतः च्या ‘नागो’ या नावाचा हिंदी इंग्लिश मिश्रित अर्थ समजुन घेतला असता म्हणजे ना..go..(नको जाउस) आणि ते दारुच्या मागे गेले नसते तर त्यांच्या कुटुंबाची एवढी वाताहत झाली नसती.
असो, पण ही गरिबी आणि दुःख भोगूनच संतोष खूप प्रगल्भ माणूस झाला आहे ह्यात शंकाच नाही, आणि प्रगलभतेतुनच सुंदर लेखन आपल्या समोर मांडले गेले आहे.
संतोष हे नाव संतोषी मातेच्या नावावरून त्याच्या आईने जरी दिले असे पुस्तकात लिहिलेले आहे, पण आपल्या लेखन कौशल्या ने आम्हाला संतुष्ट केल्याने त्या अर्थाने ‘संतोष’ नाव लेखकाने सार्थक केले आहे...
लेखकाने असंच लिहित राहावे आणि संपूर्ण जगाला संतुष्ट करत राहावे…
तुझाच
DD
Dr Abhinay Darwade
19 May 2025 05 59 PM
माझ्या आईला वाचनाची आवड, त्यामुळे एखादं पुस्तक हाती लागलं की वाचून संपवणं हा तिचा शिरस्ता! पण आईने संतोष शिंदे लिखित "पट्यारा" हे पुस्तक वाचायला घेतलं आणि ती अक्षरशः त्यात हरवली!
वाचता वाचता रडायची, मध्येच मला थांबवून त्यातला एखादा प्रसंग सांगायची!
आई जेवायला चल, अशी हाक मारली तरी थांब जरा म्हणायची!
पुस्तक वाचून संपवल्यानंतर संतोष नावाचा तिचा आणखी एक मुलगा तिला असल्याची प्रसन्न जाणीव तिने व्यक्त केली!
…आणि मग त्यानंतर माझ्या वाट्याला पुस्तक आलं!
पुस्तक हातातून खाली ठेवण्याची इच्छाच होत नाही!
जगण्याचा संघर्ष सार्थकी लागण्याचा प्रवास अनुभवायचा असेल तर "पट्यारा" वाचायला हवं!
कुठेही ओढून ताडून अलकांरीक शब्दांचा भडिमार नाही, की विनाकारण कुठलेही अतार्किक संदर्भ नाही!
हातात लेखणी आली आणि काय घडलं ते सरळ लिहून काढलं आहे!
एका वळणदार माणसानं सरळ सरळ लिहुन काढलेलं हे त्याच्या आयुष्यातला वेडावाकडा जीवनपट उलगडणारं पुस्तक थेट काळजाला भिडतं, आणि आपण संतोष शिंदेंना नव्याने ओळखायला लागतो! अगदी त्यांच्या प्रेमात पडतो!
शाळा आयुष्यात असायला हवी म्हणून धडपडणाऱ्या पोराच्या वाटेला पावलो पावली संघर्ष येतो, पण पाठीशी खंबीरपणे उभी असते त्याची आई!
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही! हे बाबासाहेबांचं वाक्य आयुष्यात उतरतं!
पहाटे उठून घरोघरी पेपर टाकून येणाऱ्या मुलाला होणारा उशीर असो, किंवा संस्कृत विषय शिकवणाऱ्या शिक्षकाने जाणीवपूर्वक केलेली कुत्सित टिप्पणी असो, सायकल च्या दुकानावरची धडपड असो, हॉटेलच्या मालकाची जिव्हारी लागलेली शिवी असो, संतोषचा संघर्ष आपल्याला एका जागी खिळवून ठेवतो!
संतोष चं आयुष्य समृद्ध करणारे अनेक महत्वाचे लोक आपल्याला टप्प्याटप्प्याने भेटत राहतात!
पोटापुरतं शिकण्याच्या पलीकडचं शिक्षण हे प्रगाढ वाचनातून येतं आणि खूप काही उमगत जातं म्हणणारे तुकाराम देवराम पाटील सर,
एकदा उखळात डोकं टाकलं ना, मग मागे वळून पाहायचं नाही, म्हणणारी आई,
हनुमानाच्या मूर्तीजवळ, मध्यरात्री,
हॉटेलमध्ये राबणाऱ्या आपल्या
लेकराची सुटण्याची वाट पाहणारे वडील,
हॉटेल मध्ये राबताना काळजीने जेवण बाजूला काढून ठेवणारे शिवराम बाबा,
टीप म्हणून मिळालेल्या पैशाचा विनियोग शिक्षणासाठी करणारी संतोषची तळमळ,
शाळेत ऍडमिशन मिळवून देणारे अण्णाभाऊ कणसे,
शाळेत आईची सावली बनलेल्या बारी मॅडम,
पुस्तक लिहिण्याचा आग्रह करणारे देशपांडे काका,
मदतीचा हात डोक्यावर ठेवणारा सायकलवाला राजू काका!
असे एक ना अनेक पात्र आपल्या समोर येत राहतात, आणि नकळत आपण त्यांचा चरणस्पर्श करत नतमस्तक होतो!
In a gentle way जगाला सतत हादरवत राहणारा महात्मा अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने परदेशात संतोषला भेटणं हा एक अनोखा सुखद क्षण आपल्याला शेवटच्या पानांवर अनुभवयाला मिळतो!
गांधी आयुष्य बदलून टाकतो, याचा प्रत्यय पुन्हा येतो, जीवन मूल्याधिष्ठित बनल्यावर गांधी भेटणं, आणि सार्थकी तृप्तीची जाणीव हातावर टेकवत पुस्तक पूर्ण होतं!
संतोष शिंदे नावाचा भाऊ मला मिळाल्याचा आनंद असा शब्दात व्यक्त करतांना आज समाधान मिळतं आहे!
Nagnath More
16 May 2025 10 33 PM
समकालीन व्यवस्थेसोबत दोन हात करण्याची वेळ आलेल्या प्रत्येकाला आपलीच आहे अशी वाटणारी कहाणी - पटयारा
संतोष शिंदे यांची पटयारा ही समकालीन अनेक तरुणांची कहाणी आहे.
अडचणीतून शिक्षण पूर्ण केलेल्या, वेळोवेळी समाजव्यवस्थेशी दोन हात करावं लागलेल्या प्रत्येकाला ही कहाणी आपली आहे असं वाटत राहतं.
आपण आपलं कर्म करत राहिलं आणि नेहमी काहीतरी नवीन शिकत राहिलं, तर यश नक्कीच मिळतं हे ह्या या कथेतून स्पष्टपणे जाणवतं!
Shruti Kukde
12 May 2025 10 18 AM
'पटयारा’ - मी आजपर्यंत बरीच पुस्तकं हातात घेतली पण पूर्ण वाचून काढले ते पटयाराच! जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकणारी संतोष शिंदे यांची आत्मकथा थेट काळजात भिडते.
त्या लहान संतोषच्या कोवळ्या तळ हातावर आलेल्या कष्टाचा भार आणि आपल्या आईला घर खर्चात मदत करणं हे सर्व वाचतांना डोळे पाणवतात.
पुस्तक वाचतांना खूपदा असं वाटत राहतं की त्या लहान संतोषला दत्तक घेऊन घ्यावं....कोण जाणे पण त्याच्याशी एक वेगळाच लळा लागतो.
जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर लेखक आपल्या विवेकबुद्धीचा वापर करून मात करत यशाची शिखरं गाठतात.
गांधीजींच्या सत्य अहिंसा या तत्त्वाचे पालन करून संतोष शिंदे यांनी माणुसकीची व्याख्या आणि परिभाषा समजावून सांगितली आहे.
धन्य ती माऊली जी लेखकाला सतत बळ देत राहते. 🙏
Hats off to the author for making this book!
Prem Gawande
11 May 2025 06 00 PM
It is real good tale against adversity! Cover page je well designed that goes with the story!
Saurav Kawade
10 May 2025 02 46 PM
आजच मी 'पट्यारा' हे पुस्तकं वाचून संपवलं..!
ज्या प्रमाणे आपण एखादी वेब सिरीज बघतो आणि नंतर काय होणार या विचारात आपण पुन्हा पुन्हा नेक्स्ट एपिसोड बघत जातो, अगदी तसंच माझं हे पुस्तकं वाचताना प्रत्येक प्रकरणानंतर झालं.
प्रत्येक पान हे एक नवीन आव्हान घेऊन लेखकावर येत होतं आणि ते हे आव्हान पेलत, त्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत, त्या आव्हानांना ते सामोरे जात राहतात.
प्रत्येक व्यक्तीला नक्कीच प्रेरित करणारं लेखन म्हणजे ‘पटयारा’ हे पुस्तक. काही प्रसंग वाचतांना तर असं वाटत होतं की मी स्वतः त्या प्रसंगांत आहे. काही ठिकाणी अंगावर काटा यावा इतके हे प्रसंग जवळचे वाटतात.
खूप उत्तम रित्या शब्दांची मांडणी केलेली असल्याने वाचतांना खरंच खूप मजा आली आणि मुख्य म्हणजे शेवटच्या पानावर आल्यानंतर सुद्धा हे पुस्तक संपूच नये असं मनात वाटत राहतं..!
Sachin Naik
10 May 2025 02 30 PM
एका बैठकीत सतत सहा तास बसून ‘पटयारा’ वाचून पूर्ण केलं!
संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच, पण ‘पटयारा’च्या खऱ्या आयुष्यतला संघर्ष पाहून मन गहिवरून आलं... लेखकाच्या आणि आईच्या जिद्दी ला लाख लाख सलाम 🙏🙏
खूप काही आहे ‘पटयारा’ कडून शिकण्या सारखं..
आयुष्यात इतकं काही सहन केलं आणि गरिबी ते सुबत्तेचा प्रवास करून सुद्धा लेखकाचे पाय जमिनी वर राहतात हे म्हणजे खूप विशेष जे शेवटच्या प्रकरणांमध्ये प्रकर्षाने जाणवत राहतं.
लेखकाच्या आतापर्यंतचा अनुभवातून त्यांचे मार्गदर्शन, विशेषतः तरुणांना, खूप उपयोगी पडेल ह्यात शंका नाही.
‘पटयारा’शी एक भावनिक नातं आपसूकच जोडलं जातं. ह्यापुढे त्याला कशाचीही कमी पाडणार नाही अशी ईश्वराला प्रार्थना!
We are blessed to have this wonderful book ‘Patyara’ to read!
Deepali Kade
10 May 2025 02 21 PM
पटयाराने माझा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला आहे!
प्रत्येकाचा ज्याचा त्याचा संघर्ष असतो, पण विचारही करवत नाही एवढा मोठा संघर्ष तुमचा आहे. मी ‘पटयारा’ वाचायला घेतलं आणि अवघ्या दोन दिवसातच पूर्ण पुस्तक वाचून संपवलं..!
खरं तर तशी पुस्तकांची आवड मला खूप नाहीये. पुस्तकं आधीपासूनच मला खूप complicated वाटतात.
थोडी काही पुस्तकं मी वाचली आहेत.... आणि आता ‘पटयारा’ हे माझं सगळ्यात आवडतं पुस्तक झालं आहे!
सर्व प्रसंग हे हृदयाला भिडणारे आणि डोळ्यासमोर येणारे आहेत. वाचन करताना सगळे प्रसंग स्वतः समोर घडत आहेत असा भास होत राहतो. पुढे काय होईल याची खूप उत्सुकताही लागून राहते.
प्रत्येक प्रसंग मला काहीतरी नवीन शिकवण देऊन गेला. अशा खूप काही गोष्टी आहेत ज्या मी ‘पटयारा’ मधून शिकले. खरंतर आयुष्याकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन मला मिळाला आहे.
पटयारा हे पहिलं असं पुस्तक आहे ज्याने मला रडवलेही आणि हसवलेही.
ज्या परिस्थितीतून तुम्ही आणि तुमचं कुटुंब गेलं खरं तर ती परिस्थिती खूप अवघड होती, पण या सगळ्यांमध्ये तुमच्या सोबत असणारी तुमच्या आईची खरंच दाद द्यावी लागेल!
आयुष्यात ज्याप्रमाणे वाईट माणसं आहेत त्याप्रमाणे चांगली माणसंही आहेत... ‘काही माणसांच्या आपल्या आयुष्यात येण्याने प्रवास जरी सुखकर होत असला तरी आपला संघर्ष हा आपल्यालाच करायचा असतो’ ही सगळ्यात मोठी शिकवण मला पटयाराने दिली....!
माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला आहे. माझ्या भोवताली परिस्थितीने हतबल झालेल्या लोकांमध्ये मला भविष्यामधला संतोष शिंदे दिसतो आहे.... मी शब्दात व्यक्त करू शकत नाही अशा एवढ्या सगळ्या गोष्टी मला ह्या पटयाराने दिल्या आहेत.....!
Thank you so much for creating such a wonderful book! ❤🥰