Hard Copy Price:
25% OFF R 200R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
जीवनात प्रेम, द्वेष, मत्सर, राग, लोभ आदी भावना मनात उमटत असतात.त्यावर नियंत्रण ठेवणे, संयम ठेवणे आवश्यक असल्याचे सांगून दया, क्षमा, त्याग शांततेची शिकवण सर्व धर्म देतात. मात्र धर्ममार्तंडानी याचा अर्थ आपापल्या परीने लावून समाजाला नियंत्रित ठेवले, लोकांमध्ये वितुष्ट आणले. धर्मे, देव, या संकल्पना काय आहेत, विज्ञान, तत्वज्ञान, तंत्रज्ञानाची गरज, आपल्या अवती भवती घडणाऱ्या घटना, प्रसंग डॉ. अनिल गांधी यांनी 'विचारी मना' मधून मांडले आहेत. यातील घटना,विषय हे प्रत्येकाच्या ओळखीचे आहेत. त्यावर केलेले विवेचन विचार करायला लावणारे आहे. मनात ज्याबद्दल प्रश्न निर्माण होतात, त्याबद्दल यात भाष्य केले आहे.
डॉक्टर अनिल गांधी यांनी लिहिलेल्या या पुस्तकात विविध विषयांचा त्यांनी वेध घेतला आहे. देवधर्म या विभागात त्यांनी धर्म आणि विज्ञान या लेखात काही मूलभूत प्रश्न विचारले आहेत. त्याचबरोबर अध्यात्माबाबतही चर्चा केली आहे. पृथ्वी आणि पर्यावरण या विभागात पर्यावरणाची काळजी कशी घ्यावी आणि ती घेणे का आवश्यक आहे, ते तपशीलवार लिहिलं आहे. मानवी जीवन या तिसऱ्या विभागात 31 लेख आहेत. यातील काही लेखांत समाजातील अनिष्ठ गोष्टींबद्दल आवाज उठवण्यात आला आहे. एका विवेकी माणसानं अस्वस्थ होऊन लिहिलेले हे लेख केवळ त्रागा किवा परिस्थितीला शरण जाऊन लिहिलेले शब्द नाहीत. डॉक्टर काही विषयांवर तोडगाही सुचवितात. आपल्या मनात या लेखांनी विचारचक्र सुरू होतं.