विज्ञानाला न उलगडलेली रहस्ये
Not in Stock

 
Hard Copy Price: 25% OFF
R 150 R 112 / $ 1.44
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Preview
Summary of the Book
जातिंगामधील पक्ष्यांचे रहस्य, भूकंपाचे भाकीत करण्याची प्राण्यांची क्षमता, हिमयुगाचे रहस्य, जुळ्यांचे समांतर जीवन अशा एकापेक्षा एक वेगळ्या विषयांची माहिती पंकज कालुवाला यांचे हे पुस्तक करून देते.

मानवाला वाटणाऱ्या अज्ञाताच्या आकर्षणातून सृष्टीचे रहस्य जाणून घेण्याचा तो प्रयत्न करीत असतो. विज्ञानाचे आधारे अशी अनेक रहस्ये उलगडली आहेत. या पुस्तकात अशाच काही रहस्यांचा मागोवा घेतला आहे.

हिमयुग, सजीव सृष्टी यासंबधीचा वैज्ञानिक माहिती मिळते. प्रत्येक सजीवाभोवती पसरलेली आभा कॅमेऱ्यात पकडणारी किर्लीआन फोटोग्राफी, भूगर्भजलाचा जमिनीत खोलवर दडलेला साठा शोधून काढणारे वॉटर डाऊझिंग हे तंत्र किंवा महाकाय प्राण्याचे रहस्य या पुस्तकातून समजते.

बर्ड मिस्ट्री ऑफ जातिंगा, 'यति' आणि 'नेसी'सारख्या दैत्याकार प्राण्यांचे रहस्य, भूकंपाची भाकीतं करण्याची प्राण्यांची क्षमता, किर्लिआन फोटोग्राफी, हिमयुगाचे रहस्य, क्रॉप सर्कल्स, जुळ्यांचे समांतर जीवन, सजीव सृष्टीचे कोडे, प्रतीपदार्थांची ब्रह्मांड ही कोडी त्यापैकीच काही.
Book Review
Write a review

Swati Kulkarni Bapat
18/12/2015

विज्ञानाला न उलगडणारी रहस्ये :- या पुस्तकातली माहिती अचंबित करणारी आहे.
साप्ताहिक लोकप्रभा
12 Dec 2015 05 30 AM

गूढ रहस्यांवर प्रकाश आज विज्ञानाने जगातील यच्चयावत घटनांचा अर्थ लावला आहे. किंबहुना आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्वच गोष्टींमागचं रहस्य उलगडून दाखविण्याचा प्रयत्न आजदेखील सुरूच असतो. इतकेच नाही तर अनेक रहस्यांच्या उलगडण्यातून विज्ञानाची प्रगतीच झाली आहे. तरीदेखील आजही अशा काही घटना आहेत, की ज्यांचा पूर्णपणे वैज्ञानिक वेध घेऊन त्यामागचं रहस्य उलगडता आलेलं नाही. अर्थात त्यासाठी वैज्ञानिक भरपूर प्रयत्न जरूर केले आहेत. पण ते ठोस निष्कर्षांपर्यंत पोहोचलेले नाहीत. अशाच काही न उलगडलेल्या रहस्यांचा वेध या पुस्तकात घेण्यात आला आहे. आसामातल्या जातिंगा येथील पक्ष्यांची सामूहिक आत्महत्या, हिमालयातील यतीचे गूढ, पक्ष्यांना लागणारी भूकंपाची चाहूल, किर्लिआन फोटोग्राफी, क्रॉप सर्कलल्स, वॉटर डाऊझिंग, हिमयुगाचे रहस्य, स्वयंभू आत्मदहन, प्रतिपदार्थाचे ब्रह्मांड अशा घटनांवर या पुस्तकातून प्रकाश टाकण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे हे पुस्तक काही केवळ रंजनात्मक पद्धतीने चमत्कृती मांडणार नाही. प्रत्येक घटनेच्या मागंच विज्ञान उलगडण्यासाठी नेमके काय प्रयत्न करण्यात आले आहेत त्याची सविस्तर माहिती हे या पुस्तकाचं विशेष म्हणावं लागेल.
konde prashant dhanaji
25/02/2015

nice book
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat