Summary of the Book
ही कादंबरी बरीचशी शृंगारिक, तितकीच मनोविश्लेषणात्मक आहे. ती प्रथम प्रसिद्ध झाली, तेव्हा महाराष्ट्रात तिने एक इतिहास निर्माण केला. कृष्णराव मराठे ‘संस्कृतिरक्षक’ यांनी ही कादंबरी अश्लील ठरवून रायकरांविरुद्ध आघाडीच उघडली. ‘विविधवृत्त’, ‘नवयुग’, इत्यादी वृत्तपत्रांनी कादंबरीवर व लेखकावरही कठोर टीका केली. पण त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेने आणि मान्यवर, थोर समीक्षकांनी तिचे भरघोस स्वागत केले.
ठिकठिकाणी तिच्यावर जाहीर चर्चा झाल्या . अनुकूल-प्रतिकूल अभिप्रायांमुळे कादंबरीबद्दल वाचकांचे कुतूहल वाढले आणि अनपेक्षितपणे कादंबरीची पहिली आवृत्ती संपून गेली.
आजसुद्धा रायकरांना जुने वाचक ओळखतात, ते ‘तीन तरुणी’ चे लेखक म्हणूनच.
ही कादंबरी अनेक वर्षे ग्रंथालयांतही उपलब्ध नसल्यामुळे अनेक वाचकांच्या आग्रहावरून तिची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध होत आहे.