Hard Copy Price:
25% OFF R 170R 127
/ $
1.63
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
कविता महाजन यांच्या 'भिन्न ' कादंबरीतून महानगरीय स्त्रियांच्या जगण्याचे अनेक पैलू समोर आले आहेत. या कादंबरीचा समग्र शोध पुरुषोत्तम तायडे यांनी 'भिन्न : एक आकलन' या ग्रंथातून घेतला आहे. स्त्रियांचे शारीरिक आणि मानसिक या दोन्ही पातळ्यांवर शोषण होत असते. एड्ससारख्या रोगाच्या पार्श्वभूमीवर महानगरातील स्त्रियांच्या जगण्यातील उद्ध्वस्तता नेमकी कशी आहे, याचा शोध या ग्रंथात घेतला आहे. स्त्री - समस्याकेंद्री असलेल्या 'भिन्न ' कादंबरीतील धर्म, वर्ण, वर्ग, जात आणि लिंग या पितृसत्ताक संकल्पना बाईच्या आयुष्यावर काय आणि कसा प्रभाव टाकतात याचा शोध ' भिन्न ' कादंबरीच्या आधारे लेखकाने घेतला आहे. स्त्रीकेंद्री अभ्यासपद्धती वापरल्यामुळे या ग्रंथातील विवेचन स्त्रीविषयीच्या सामाजिक धारणा अभिव्यक्त करणारे आहे. लैंगिकतेच्या चुकीच्या धारणांमुळे उन्मळून पडलेल्या अनेक स्त्री - पुरुषाचे जगणे 'भिन्न ' कादंबरीत कशा पद्धतीने चित्रित केले आहे, याचा घेतलेला हा शोध पुरुषोत्तम तायडे यांची संवेदनशील सामाजिक जाणीव स्पष्ट करणारा आहे. - प्रा. डॉ. वंदना महाजन
प्रा. काशिनाथ बर्डे
25 Dec 2018 06 07 PM
कविता महाजन' यांच्या 'भिन्न'या रिपोर्टाज स्वरूपाच्या प्रयोगशील कादंबरीचे सखोल विश्लेषण करणारे हे पुस्तक आहे. पुरूषोत्तम तायडे यांनी 'भिन्न' कादंबरीचे रचनेच्या अंगानी, विविधांगी आशयसूत्रे,भाषाशैली व लेखिकेची जीवनदृष्टी यासंबंधी मांडणी केलेली आहे. विशिष्ट साहित्यकृतीचा अभ्यास करताना सदर पुस्तक अभ्यासकास नवी दृष्टी देते.
डॉ. उमेश सिरसट
29 Nov 2018 11 44 AM
'भिन्न : एक आकलन' हा कविता महाजन यांच्या 'भिन्न' या कादंबरी वरील एक उत्तम समीक्षा ग्रंथ आहे. कविता महाजन यांचा परिचय देऊन, त्यांच्या इतरही साहित्याची थोडक्यात ओळख करून दिली आहे. भिन्न या कादंबरीतील विविध आशयसूत्रे सूक्ष्मपणे उलगडून दाखवली आहेत. कादंबरीच्या आशयाला ज्या विविध छटा आहेत, त्या सोप्या भाषेत मांडल्या आहेत. कादंबरीतील व्यक्तिरेखा, वाङ्मयीन आकलन कादंबरी विषयी नवी जाण विकसित करते. स्त्रीवादी दृष्टीकोनातूनही कादंबरीचे आकलन मांडले आहे. ग्रंथातील कविता महाजन यांची मुलाखत महत्त्वपूर्ण आहे. एखाद्या नवोदित वाचकाला, अभ्यासकाला साहित्य कृतीचे आकलन कसे करावे, याविषयी चांगले मार्गदर्शन या ग्रंथातून मिळू शकते.
निशा भगवान पागेरे
23 Nov 2018 03 26 PM
'भिन्न : एक आकलन ' हे प्रा.पुरूषोत्तम सदानंद तायडे यांचा कविता महाजन यांच्या भिन्न या कांदबरीवरील समीक्षापर ग्रंथ एक सखोल असे आकलन आहे, हे निरिक्षणाअंती आपल्या लक्षात येते. या ग्रंथात लेखकाने भिन्न कादंबरीतील आशयाचे विश्लेषण, त्यातील पात्रांच्या मनाचा,वर्तनाचा सर्वांगीण आढावा, त्याचप्रमाणे या कादंबरीतील स्रीपात्रांच्या तोंडी लेखिकेने घातलेली भाषा व त्याबद्दल इतरांच्या आक्षेपांचे लेखकाने केलेले खंडन मंडन विशेष लक्ष वेधून घेतात. समीक्षापर ग्रंथाचा एक उत्तम नमूना प्रा.पुरूषोत्तम तायडे यांनी अभ्यासकांसमोर ठेवला आहे.
स्वाती भोईटे
19 Nov 2018 01 53 PM
'भिन्न' ही कविता महाजन यांची नव्वोदत्तरी मराठी साहित्यातील एक महत्त्वाची आशय, विषय व संरचना या दृष्टीने प्रयोगशील कादंबरी आहे. स्त्री-समस्याकेंद्री स्वरूपाची ही कादंबरी आहे. प्रा.पुरूषोत्तम तायडे यांनी 'भिन्नः एक आकलन' या ग्रंथाची स्त्रीवादी समीक्षा दृष्टिकोनाच्या आधारे मांडणी केलेली आहे. या समीक्षा ग्रंथातून साहित्यकृती, कविता महाजन यांच्या लेखनशैली संदर्भातील निरीक्षणे अभ्यासपूर्ण आहेत. साहित्याच्या संशोधनाच्या क्षेत्रातील नवख्या अभ्यासकाला हा ग्रंथ मौलिक ठरणारा आहे. ह्या ग्रंथाची भाषाशैली सहजपणे आकलन होईल अशी आहे.