Hard Copy Price:
25% OFF R 250R 187
/ $
2.40
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
A novel based on time travel concept. I was interested in this concept since my childhood. I liked this novel. I had read this writer's another novel namely Bhaskarayan and have become his fan.
विनोद पोतनीस
08 Oct 2021 05 56 PM
पुण्याच्या सोहम प्रकाशनाने प्रकाशित केलेली माधव जोशी लिखित कालयात्री ह्या कादंबरीचे सुरेख मुखपृष्ठ पाहूनच मी लगेच ती आमच्या वाचनालयातून वाचायला घेतली. वाचायला सुरुवात केल्यावर हातातून खाली ठेवताच आली नाही एवढी तिची कथा जबरदस्त आहे. लेखकाने जरी ही एक अद्भूतिका असल्याचे म्हंटले असेल,तरीही मी ती वाचताना इतका गुंगून गेलो होतो की जणू काही मीच त्या कादंबरीचा नायक नरेश आहे. लेखकाच्या कल्पनाशक्तीला लाख लाख सलाम ! ह्यातील सुरुवातीचा नायकाचा जगननियांत्या बरोबरचा संवाद तर लक्षणीयच आहे. ही fantasy असूनही वाचकांना त्यात लेखकाने पुरेपूर गुंतवून टाकलेले आहे. कथेचा शेवट धक्कादायक असला तरीही तो त्यावेळची परिस्थिती पाहता योग्यच वाटतो. मराठीत अशा प्रकारची टाईम मशीनमध्ये बसून प्रवास केल्याची कथा मला वाटते ही पहिलीच असेल. लेखकाचे व प्रकाशकाचे अभिनंदन.
ही कादंबरी बुक गंगावर उपलब्ध असल्याचे कळल्यामुळे मी माझी प्रतिक्रिया ह्या मंचावर मांडलेली आहे. सर्वांनी जरूर वाचावी अशीच ही कादंबरी आहे.
केशव गांगुर्डे
28 Apr 2021 11 27 AM
माधव मनोहर जोशी ह्या लेखकाने लिहिलेली कालयात्री ही एक जबरदस्त कादंबरी नुकतीच वाचली. अशी उत्कंठा वर्धक कादंबरी लिहिल्याबद्दल लेखकाचे तसेच अशा वेगळ्या विषयावरील कादंबरी प्रकाशित करणाऱ्या सोहम प्रकाशनचे अभिनंदन ह्यातील मला आवडलेल्या गोष्टी पुढील प्रमाणे आहेत.
1. मराठीत टाईम मशीन ह्या विषयावर आधारित फारसे साहित्य उपलब्ध नाही. ही कादंबरी ह्या वेगळ्या विषयाचा वेध घेते.
2. कथानायकाचा देवाबरोबर झालेला संवाद खूपच झकास आहे.
3. वाचताना आपणही काळाच्या मागे 1300 वर्षे जातो व कथेचा एक भागच होऊन जातो. ही कथा आपल्याला पार भारून टाकते.
4. कथेचा शेवट अनपेक्षित पण चटका लावुन जातो.
मराठी साहित्यात ही कादंबरी एक मोलाची भर घालणार ह्यात शंकाच नाही.
उमा केळकर
16 Apr 2021 11 52 AM
मॅजेस्टिक बुक स्टॉल मधून मी ही कादंबरी विकत घेतली व मला ती इतकी आवडली त्याच्याबद्दलच्या भावना व्यक्त करण्यासाठी मी बुक गंगा हा पर्याय निवडला. तसेच मी माझ्या फेसबुक पेज वर सुद्धा ह्या कादंबरीबद्दल लिहीणार आहे.
या लेखकाची भास्करायाण ही कादंबरी मी गेल्या वर्षी वाचली होती व मी या लेखकाची फॅन झालेले होते . टाईम मशीन ह्या कन्सेप्ट वर आधारित माझ्या मते मराठी मध्ये फारसे साहित्य उपलब्ध नाहीये. या लेखकाने हा विषय निवडून अतिशय सुंदर कादंबरी त्यावर रचलेली आहे. एक इंजिनियर दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडतो व तो एका नैसर्गिक टाईम मशीनमध्ये अडकून थेट तेराशे वर्षापूर्वीच्या नालंदा विश्वविद्यापीठत जाऊन पोचतो. या काल प्रवासात त्याचे एका अदृश्य जगन्नियंता बरोबर झालेले संभाषण लेखक माधव जोशी यांनी अतिशय उत्कृष्ट रित्या रंगवलेले आहे. पुढे 47 वर्ष या कथा नायकाला नालंदा मध्येच अडकून पडावे लागते, तेथे तो प्रख्यात चिनी प्रवासी यु एन संग याला भेटतो. या चीनी प्रवाश्याची सर्व कथा ही आपल्याला वाचायला मिळते. वाचक ह्या कथेमध्ये अक्षरश: गुंगून जातो.
कादंबरीच्या शेवटी लेखक वाचकांना एक जबरदस्त धक्का देण्यात यशस्वी झालेला आहे. सर्वांनी ती वाचावी.
रमेश दुर्वे
13 Mar 2021 12 24 PM
मी माधव जोशी या लेखकाच्या भास्कर आयन व ओजस्वी हया दोन्ही कादंबर्या वाचून अतिशय प्रभावित झालेलो होतो व त्यामुळे या लेखकाची कालयात्री ही नवीन कादंबरी अक्षरशः आधाशाप्रमाणे वाचून काढली.
कालयात्री ही कादंबरी वाचून मी प्रचंड प्रभावित झालेलो आहे. मराठी मध्ये टाईम मशीन ह्या विषयावर फारसे साहित्य उपलब्ध नाही. त्यामुळेच टाईम मशीन या विषयावर आधारित असलेली ही कादंबरी मराठी साहित्य मध्ये नक्कीच मोलाची भर घालणार आहे. या कादंबरीतील हिरो दुर्दैवानं एका नैसर्गिक टाईम मशीनमध्ये अडकून काळाच्या फार मागे तेराशे वर्ष जातो व नालंदा विश्वविद्यापीठात जाऊन पोचतो. तिथे त्याची भेट प्रसिद्ध चिनी प्रवासी हू एन संग याच्याशी होते. या विश्व विद्यापीठात तो चक्क 47 वर्ष अडकून पडतो. त्या काळाची जबरदस्त वर्णने वाचत असताना वाचकाच्या अंगावर शहारे येत असतात. आपल्या मराठी भाषेतील ही एक अद्भुत अशी फॅन्टसी आहे. सर्वांनी ही कादंबरी जरूर वाचावी.