Summary of the Book
मनाला जे जाणवते त्याला शब्दरूप देणे फारच थोड्या लोकांना जमते. नागनाथ कोत्तापल्ले यांना जे जाणवले, भावले ते लिहून काढले. त्यांच्या कथांमध्ये आजूबाजूला, समाजात जे चालले आहे, त्याचे प्रतिबिंब दिसते. ‘देवाचे डोळे’मध्ये हा अनुभव घेता येतो. यातील प्रत्येक कथा ही मानवी भावनांनी भरलेली आहे. यात द्वेष, प्रेम, तिरस्कार आदी भावभावनांचा खेळ पाहायला मिळतो. एकूण १७ कथांचे कथानक वेगळे असले, तरी समाजाच्या मानसिकतेशी जवळीक साधणारे आहे. त्यामुळे या कथा वेगळ्या वाटतात.