Summary of the Book
एक बद्ध चौकटीत.
दुसरा मुक्त.ओलांडतो उबरंठा.
दार आदळतंच तेव्हा.
चौकट, घर, अवकाश अंतर्बाह्य
थरथरतं क्षणभर,
मग निद्रिस्त, मख्ख, कूस बदलतं फक्त.
चौकटीच्या आधाराने गच्च
बोटं तेवढी झेजरतात.
नखं मुळातून तुटतात.
त्वचेवर उमटलेले थेंब तेवढे उरतात.
थिजलेल्या रक्ताचे.
शरीरभर वेदना.
मरेपर्यंत गोठलेली.
आणि न रडण्याचा अट्टहास.
चौकटीतला गुदमरलेला
आणि घुसमटलेला!
प्रत्येक घर, प्रत्येक चौकट,
प्रत्येक दारामागे एक कथा!