Summary of the Book
'तुमचा फॅमिली डॉक्टर' असं बिरुद मिरवणारा शतायुषीचा अंक यावेळी वैशिष्ट्यपूर्ण आहे तो लग्नाआधीचे आणि लग्नानंतरचे आजार या खास विभागामुळे. 'तारुण्यातील लेणी मुलांची मुलींची' हा तरुणाईत होणाऱ्या शारीरिक बदलांची माहिती देणारा लेख माहितीपूर्ण आहे.
लग्नापूवीर्च्या तपासण्या आणि लपवले जाणारे आजार याविषयी डॉ. नितीन संगमनेरकर यांनी लिहिलेय. 'लग्न कोणी करू नये - काही विशेष आजार' या लेखातली माहिती विवाहेच्छुकांसाठी महत्त्वाची. उशीराच्या वयातील लग्नांमध्ये येणाऱ्या प्रश्ानंविषयी डॉ. व्ही. के. शर्मा यांनी लिहिलंय.
आयुवेर्दासाठी वेगळा विभाग आहे. डॉक्टरी सत्यकथांमध्ये वैद्यकीय व्यवसायातील सुरस आणि चमत्कारिक तसेच भावनेला हात घालणारे अनुभव वाचता येतात. औषध न लगे मजला या विभागातील लेखही 'आरोग्यपूर्ण'!