Summary of the Book
शालेय विद्यार्थी असोत अथवा महाविद्यालयीन किंवा नोकरदार असोत, बहुतेकांना सोमवार म्हटले की अंगावर काटा येतो. कारण आठवड्याचा हा पहिला दिवस. रविवारची सुटी संपवून अभ्यास किंवा कामाला सुरुवात करण्याचा हा दिवस; पण हा दिवस कसा चैतन्यदायी, ऊर्जादायी असू शकतो, हे नविन काळे यांच्या या पुस्तकातील लेखांमधून समजते.
अलीकडच्या काळातील नवनवे विषय, अनेक अनुभव त्यांनी वाचकाबरोबर शेअर केले आहेत. 'संघर्षाचा काळ हा यशाचा शॉर्टकट,' असा तरुणांशी संवाद साधणारा लेख जसा पुस्तकात आहे, तसाच गुलजार यांचे व्यक्तिमत्व, त्यांचे काव्य संवेदनशील मनाने टिपणारा लेखही वाचायला मिळतो. खाण्याविषयीचा चुरचुरीत लेख जसा आहे, तसाच राजकारण अथवा 'हेमलकसा' वरील लेखही आहे.