Summary of the Book
रफी म्हटला की , आपल्याला फक्त शंकर जयकिशन , ओ .पी नय्यर , सचिनदां, रवी चित्रगुप्त , लक्ष्मीकांत -प्यारेलाल वगैरे ठराविक संगीतकारांचाच आठवतो , पण अन्य संगीतकारांचीही गाणी ऐकण्याचा प्रयत्न केला तर रफीनामक सागरात हिरे -माणकांचा खजिनाच सापडतो . त्यातील हिरे घेऊ की माणके घेऊ अशी आपली भांबावलेली अवस्था होते.
रफीच्या आवाजातील तन्मयता आणि तीव्रता एवढी प्रकर्षाने जाणवते की, पाषाणालाही पाझर फोडणारा त्याचा आवाज होता . एक प्रकारची अजब तन्मयता , गोडवा आणि माधुर्य रफीच्या कंठात काठोकाठ भरलेलं होतं . पुष्कळ पार्श्वगायकांनी रफीची नक्कल करण्याचा प्रयत्न केला . पण रफीच्या गाण्यातला घुमार व गोडवा त्यांना कधीच जमला नाही.