Summary of the Book
डॉ. नो हा कमालीचा निर्दय आणि परपीडक वृत्तीनं पछाडलेला एक मनोविकृत इसम होता. ब्रिटिश सीक्रेट एजंट जेम्स बाँड त्याच्या पोलादी पकडीत सापडला होता. जमैकामधल्या ब्रिटिश सीक्रेट सव्र्हिसच्या गुप्त ठाण्यावरची दोन माणसं रहस्यमयरित्या नाहीशी झाली होती... त्यांचा तपास घेण्याकरता 'एम'नं जेम्स बाँडला जमैका बेटावर धाडलं. त्याच्या संबंधीचे काही धागेदोरे कॅरिबिअनमधल्या 'क्रॅब की' बेटाशी पोहोचत होते. डॉ. नो च्या गुप्त कारवायांचा वेध घेण्यासाठी जेम्स बाँड त्या बेटावर दाखल झाला. तिथे योगायोगानं हनिसील रायडर या भोळ्या, निष्पाप तरुणीशी त्याची गाठ पडली आणि ती दोघंही अगदी आयतीच डॉ. नो च्या कचाट्यात सापडली. डॉ. नो नं आखलेल्या मृत्युच्या भयानक सापळ्यामधून सुटका करून घेण्यासाठी बाँड आणि हनी प्राणपणानं झगडू लागली आणि मग...