Summary of the Book
`ईश्र्वर’ या संकल्पनेशी निगडित धर्म, अध्यात्म, तत्त्वज्ञान, श्रद्धा-अंधश्रद्धा यांबाबत आस्था आणि कुतूहल असणार्या वाचकांसाठी `ईश्र्वराच्या’ अस्तित्वाविषयी धांडोळा घेण्याचा प्रयत्न करणारे वैचारिक व ललितलेख आणि मुलाखतींचे पुस्तक.
या पुस्तकातील मान्यवर लेखक आहेत मंगेश पाडगावकर, दि. य. देशपांडे, अनिल अवचट, राम शेवाळकर, यशवंत पाठक, विश्र्वास पाटील, मो. रा. गुणे, सुभाष दांडेकर, प्रमिला दंडवते, डॉ. व्ही. एन्. श्रीखंडे, राजन खान, फ्रान्सिस दिब्रिटो, व्ही. गो. कुलकर्णी, चंद्रशेखर धर्माधिकारी, यशवंत देव, केशव मेश्राम, डॉ. के. राममूर्ती, प्रतिभा रानडे, के. ज. पुरोहित, डॉ. नीतू मांडके आणि डॉ. शेखर आंबर्डेकर