Summary of the Book
प्रतिभा जगदाळे यांचा ललित लेखांचा हा संग्रह. यातील काही लेख हे एखाद्या कथेसारखे आहेत. मानवी नातेसंबंधाबाबत भाष्य करणाऱ्या या सर्व लेखांमध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे माणुसकीच्या ओलाव्याचा आणि आपुलकीचा. छोट्या छोट्या प्रसंगांतील व्यक्तिचित्रण आणि घटनांचा तपशील नेमका असल्याने वाचक यात गुंतला जातो. केवळ मनोरंजन हा या लेखांचा हेतू नाही. समाजातील चांगल्या गोष्टी नेमकेपणाने टिपून त्या इतरांपर्यंत पोचवण्याची आस त्यात आहे. लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची या पुस्तकाला प्रस्तावना आहे.