पराक्रमापलीकडले शिवराय
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 200 R 150 / $ 1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
रवींद्रनाथांनी शिवरायांवर जे दिव्य लिहिलं आहे, त्याचा परामर्श या पुस्तकात लेखकांनी घेतला आहेच, परंतु रवींद्रनाथांच्या ''Where the head is high'' या कवितेत राष्ट्राची कल्पना स्पष्ट करताना भयशून्य समाजनिर्मिती हा राष्ट्राचा मूलाधार असल्याचे म्हंटलं आहे. पंडित नेहरू यांनीही 'नियतीशी करार' या त्यांच्या स्वातंत्र्याच्या पहिल्या भाषणात स्वातंत्र्याची व्याख्या,'स्वातंत्र्य म्हणजे निर्भय समाज अशी केली आहे.

पण या आधुनिक काळातील स्वातंत्र्याच्या अनेक शतकापूर्वी शिवरायांनी केलेले हे साम्राज्य याच प्रमुख मूल्यावर आधारलेलं होतं. त्यांनी त्यांच्या समाजाला निर्भय बनवलं आणि स्वाभिमानी बनवलं. त्यांनी जे निर्भयतेचे बीज रोवले, त्यातून जी समाजनिर्मिती झाली, तिनेच पुढील काळात साम्राज्यवादी ब्रिटिशांशी लढण्याची प्रेरणा समस्त भारतीयांना दिली. त्यामुळे शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचं महत्व निव्वळ मध्ययुगीन काळातील ठराविक कालखंडापुरते मर्यादित कधीच नव्हते, शिवाय ते महाराष्ट्र व दक्षिण भारतीय भागापुरते देखील मर्यादित नव्हते.
Book Review
Write a review

Dnyaneshwar Gore
08 Apr 2020 05 30 AM

अप्रतिम पुस्तक, Everyone should be read this book.
Aniket Gawand
01 Jul 2020 05 30 AM

प्रत्येक पालक, विद्यार्थी, शिक्षक....खरंतर प्रत्येक भारतीयाने वाचावं असं पुस्तक. शिवचरित्रातून आपण काय घ्यावं ह्याच नेमकं उत्तर ह्या पुस्तकात सापडत. लेखकाने फक्त इतिहासाचे दाखले दिले नाहीत तर इतिहासाकडे डोळसपणे बघण्याकरिता उद्युक्त केलं आहे. आवर्जून वाचा, महाराजांना अधिकाधिक समजून घ्यायची ओढ लागेल. लेखक प्रशांतभाऊंचे आभार आणि पुढील वाटचालीसाठी शिवमय शुभेच्छा !!
Gaurav Gajare
30/12/2018

अप्रतिम पुस्तक 👌
POPAT JARHAD
21/12/2018

पराक्रमापलीकडले शिवराय ह्या पुस्तकात लेखकानी छत्रपती शिवाजी महाराज यांची विचारधारा जनमानसात पोहचवण्याचा फार छान प्रयत्न केलाय आणि त्यात त्यांना यश मिळालय.
Santosh Chavan
21/12/2018

श्री प्रशांत बबनराव लवटे यांनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात 'पराक्रमापलिकडले शिवराय' पुस्तक रूपात उभे करण्याचे दिव्य केले आहे. शिवराय पराक्रमी होते यात वादच नाही, त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे सूर्य चंद्र असतील तोपर्यंत गायले जातीलच. या पराक्रमा खेरीज शिवरायांच्या थोरपणाची महती सांगणारं हे पुस्तक. शिवरायांनी फक्त राज्य नाही उभे केले तर ते सर्व अर्थाने 'स्वराज्य व सुराज्य' होते.शिवरायांचे व्यक्तिमत्त्व, त्यांची धोरणे, त्यांचे प्रशासन, सामाजिक बांधिलकी, न्याय व्यवस्था, राजकारण अशा अनेक पैलू मुळे शिवराय तुमच्या माझ्या सारख्या लाखो करोडो लोकांच्या मनावर आजही राज्य करत आहेत.शिवरायांचे स्वराज्य कसे लोककल्याणकारी होते याचे लेखक अनेक उदाहरणे देऊन विश्लेषण करतात. हे पुस्तक शिवचरित्र डोळस पणे पाहायला शिकवते.
SAIPRASAD GUTTIKONDA
21/12/2018

आजघडीला जनमानसात शिवरायांचा इतिहास म्हणजे फक्त ढाल-तलवारीचा इतिहास असा समज आहे पण ह्या पुस्तकाने तो समज मोडित काढत छत्रपतींचा इतिहास हा फक्त ढाल-तलवारीचा इतिहास नसुन तो विविध क्षेत्रांना स्पर्श करणारा इतिहास आहे.
Pranil pawar
21/12/2018

आजवर शिवरायांच्या पराक्रमावर अनेकांनी लिहले पन पराक्रमापलीकडले शिवराय पहिल्यांदाच वाचायला मिळाले ते या पुस्तकातून. लेखकाने कुठलाही कल्पनाविलास किंवा तर्कहीन मुद्दयांकडे न जाता शिवरायांच्या चरित्रातून आजमितीला काय आत्मसात करावे हे अगदी मुद्देसूद मांडले आहे. शिवरायांच्या विश्ववंदनीय चरित्राकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची ही नविन मुहूर्तमेढ म्हणायला हरकत नाही.
Shrinivas
21/12/2018

A crispy book on importance of Chatrapati Shivaji Maharaj's extraordinary life beyond his bravery on battlefield..!! Out of the box perspective of Shivaji's life and its positive impact in 21st century. A 'must to have copy' in one's bookshelf.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat