Summary of the Book
समुपदेशन करताना विविध रुग्णांच्या समस्या पाहायला मिळतात. छोट्या छोट्या तक्रारीतून मुलांच्या वागणुकीत फरक पडतो आणि समस्या वाढत जाते त्याचे स्वरूपही वेगळे असते. विविध अडचणींमुळे मुलांच्यात न्यूनगंड निर्माण होतो. त्यातून समस्या वाढतच जाते. मुलांच्या या समस्येनं त्यांचे पालक त्रस्त होतात. काय करावं ते कळत नाही. अशा वेळी मानसोपचार करणाऱ्या तज्ज्ञाची वेळीच मदत घेतली तर ही समस्या सुटू शकते. सोनाली दातार या समुपदेशक म्हणून गेली अनेक वर्षे काम करत आहेत. त्यांना आलेल्या विविध अनुभवांतून हे पुस्तक तयार झाले आहे. पालकांना दैनंदिन जीवनात हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल.