Summary of the Book
मराठी-बंगाली या दूरस्थ द्वैताच्या सांस्कृतिक नात्याचा वेध घेणं, हे गुंतागुंतीचं प्रकरण आहे. एखादा समाजशास्त्रज्ञच ते करू जाणे! मराठी मंडळींना बंगल्यांच्या कलासक्त जीवनशैलीचं, तरल बुद्धिमत्तेचं, त्यांच्या सुमधुर भाषेचं अप्रूप! तर बंगाली मंडळींना मराठी मंडळींच्या नेतृत्वगुणाचं संगीत-नाट्यादी कालाक्षेत्रांतील भरा-यांचं कौतुक. बंगाली इतिहास-लेखकांना शिवाजी महाराजांसारख्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवणा-या असामान्य राजाविषयी प्रचंड आकर्षण, तसंच एकोणिसाव्या शतकात एकापेक्षा एक उंच व्यक्तिमत्वांच्या नेतृत्वगुणांविषयी आदरमिश्रित कुतूहल; तर मराठी जनांना धर्मसुधारणा घडवून आणणा-या बंगाली सुधारकांनविषयी अपार ममत्व. किती मराठी मुला-मुलींची नावं-उपनावं मूळ बंगालीत आहेत, याचा शोध घेतला की या सांस्कृतिक आदान-प्रदानाची व्याप्ती कळण्यास मदत होते. पण पुढे दोन्ही समाज अधिकाधिक अंतर्मुख होत गेले.
विविध मराठी नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचा हा संग्रह वाचनीय तर आहेच, पण वाचनीयतेपेक्षाही तो अधिक काही देतो. ते अधिक काय, हे पुस्तक वाचतानाच काळात राहील.