Summary of the Book
ठेलारी जमातीच्या जीवनावरची ही कादंबरी. शेतावर शेरडी-मेंढरे बसवून त्या बदल्यात शेतकर्यांकडून होणार्या उत्पादनावर गुजराण करणारी ही भटकी जमात. ठेलारी जमातीच्या आयुष्याचे सखोलपणे निरीक्षण करून ज्ञानेश मोरे यांनी ही कादंबरी लिहिली आहे. ठेलारी जमात ही कष्टाळू, प्रामाणिक अशी आहे. या जमातीचे जगणे, त्यांच्या चालीरीती, त्या जमातीतील लोकांचा पोशाख या सार्याचा बारकाईने वेध घेऊन लेखकाने इथे चांगले कथानक उभे केले आहे.