तू गेल्यावर
9788194713562
Aksharbandh Prakashan
Kavitasangraha
Nashik
Poem
Sushama Gujarathi
Tu Gelyavar
अक्षरबंध प्रकाशन
कवितासंग्रह
तू गेल्यावर
नाशिक
सुषमा गुजराथी
Pages: 56
Weight: 154 Gm
Binding:
Paperback
ISBN13: 9788194713562
Hard Copy Price:
25% OFF
R 120
R 90
/ $
1.15
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Darshana Patel
29/07/2022
सुषमा तुझी प्रत्येक कविता मनापासून आवडली .सुरूवातीला प्रत्येक शब्दातुन व्यक्त होणारीतुझी व्यथा काळजाला भिडणारी आहे, पण समाजातील प्रत्येक स्रीची व्यथा मांडतांना तुझ्या कणखर रुपाच दर्शन देऊन जात.
निसर्गाच्या प्रत्येक रुपाच वर्णन तुझ्या कवि मनाच दर्शन घडवत .
तु समर्थपणे सर्व जबाबदारी पार पाडलीच .पण पुस्तकाच्या रुपाने तुझ्यातील इतर अनेक गुणांची चुणूक दिसली .
तुझे मनापासून अभिनंदन 💐💐💐💐💐
भिवराज गायकवाड
18/07/2022
अतिसुंदर कविता संग्रह. मनाला स्पर्श करणारी. हृदयात शब्दाना सामावून घेणारी 👌👌
Dr. Shrirang Wagh
18/07/2022
"तू गेल्यावर" हा सुषमा गुजराथी लिखित काव्यसंग्रह वाचण्यात आला, अत्यंत हृदयस्पर्शी काव्यातून एका स्त्री ने जीवनाशी दिलेली झुंज वाचून मन भरून आले तसेच जीवन जगण्यासाठी नवीन प्रेरणाही मिळाली. नियतीने सर्वस्व हिरावून घेतल्यावरही त्याचा धीराने स्वीकार करून मनातील भावनांचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे केले आहे. मानवेधक, उत्कृष्ठ व प्रेरक कवितासंग्रह प्रत्येकाने नक्की वाचायला हवा, सुंदर, खूपच छान !!!
खूप खूप सुंदर कविता संग्रह आहे. कविते मधील भावना मनाला भावुन जातात. 👌👌
Prashant Ahire
18/07/2022
खूप सुंदर कविता संग्रह
निसर्ग प्रेम आणि जीवन संघर्ष सुरेख शब्दात मांडून उत्कृष्ट काव्यरचना आहे
अशोक गुणाजी गायकवाड
18/07/2022
एकाकी पडल्यावर कवयित्री नी खंबीर पणे उभे राहून दिलेला लढा आणि त्या वेळेच्या आठवणी नी युक्त कविताचा सुरेख संग्रह
Annasaheb Nanaware
18/07/2022
अंत्यत हृदयस्पर्शी कविताचा संग्रह 👌👌👌
सौ साधना लाड नागपूर
17/07/2022
'*तू गेल्यावर*' सुषमा गुजराती यांचा काव्यसंग्रह मनाला खूप भावला. संसाररूपी सागरात विहार करताना अचानक आलेल्या जीवनातील वादळाला घाबरून न जाता धैर्य दाखवून नाव पैलतीरी हाकून नेली.त्यांच्या या साहसाला सलाम. संसारात त्यांना त्यांच्या जोडीदाराची पावलोपावली आठवण येते.एकाकीपणा वाटतो. पण त्या आपले दु:ख न कुरवाळता मुलांसाठी खंबीरपणे उभ्या राहतात. त्यांचा जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन दिसतो.
त्यांच्या कवितांमध्ये विषयांची विविधता दिसते. निसर्गाशी त्यांची खूपच जवळीक आहे.निसर्गाच्या सहवासात त्यांना आनंद मिळतो. मन ताजेतवाने व प्रफुल्लित होते. त्यांच्या कविता हृदयस्पर्शी आहेत.
सौ.साधना लाड
नागपूर.
सौ. सुनंदा शिरुडकर
17/07/2022
सुषमा गुजराथी या माझ्या जिवलग मैत्रिणीच्या कवितांचा संग्रह हा एक र्हदयस्पर्शी काव्यानुभव आहे.
ओघवत्या रसाळ भाषेत लिहिलेल्या या कविता मनात घर करतात.
पतीवियोगा नंतर ज्या जिद्दीने त्यांनी संसार सावरुन मुलांन मोठे केले, ती जिद्दतर वाखाणण्या सारखीच ! कवितांमधून देखील ही जिद्द जाणवते.
बर्याच दिवसांनी एक छान कविता संग्रह वाचण्याचा आनंद मिळाला.
surekha mahagaonkar (shool)
16/07/2022
सुषमा, थँक्स pdf शेअर केल्या साठी. कविता संग्रहाचे शीर्षक कवीयत्रीच्या मनातील भावना आणि विचार प्रगट करते. तुझ्या कविता वाचल्या, खूपच सुंदर रित्या शब्दांची गुंफण करून तू सगळे प्रसंग छान उभे केलेत, तुझ्यातली जिद्द आणि कणखरता दिसून येते. एवढ्या साऱ्या दिव्यातून , तू दोन्ही भूमिका यशस्वी रित्या पार पडल्यात👍. तुझ्या धारिष्ट्याला आणि खंबीर पणे टक्कर देऊन यशोशिखर गाठलेत , त्यासाठी तुला सलाम!!!! कविता संग्रह प्रकाशनासाठी सुषमा तुझे खूप खूप अभिनंदन !!!!!🌹🌹👏🤝
Proud Feeling...
Kalpana Songadwala
16/07/2022
सुषमा गुजराती लिखित .तू गेल्यावर
काव्यसंग्रह वाचला.
जीवनाच्या सारिपटावर अर्धवट डाव सोडून त्यांचा जीवनसाथी अचानक काळाच्या पडद्याआड गेला.त्याच्यासमोर दु:खाचा महामेरू उभा.पण जीवनाच्या रंगमंचावर आई आणि वडील दोन्ही भूमिका उत्तम वठवून आपल्या पिल्लांच्या पंखाना बळ देण्यासाठी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. आपले दु:ख आणि आठवणी त्यांनी मनाच्या कप्प्यात जेरबंद केल्या
त्यांच्या कवितांमध्ये जीवनात आलेल्या एकाकीपणाचे दु:ख, समाजातील विविध चालीरीती,यांचे प्रतिबिंब तर आहेच. पण त्यांच्या वर दु:खाचा डोंगर कोसळल्यावर खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या सासूबाईंविषयी वाटणारा आदर कवितेतून व्यक्त केलेला आहे.
कवयित्री निसर्गप्रेमी असल्याने निसर्गातील विविध रंगछटा त्यांनी आपल्या मनाच्या कॅनव्हासवर रेखाटल्या आहेत.फेसाळलेला समुद्र, खळखळून वाहणारा धबधबा, चंद्र आणि टिपूर चांदणे, डोंगर नद्या, हिरवी वनराई,फुले यांचे मनमोहक वर्णन त्यांच्या कवितांमध्ये दिसते. सोनपावलांनी येऊन गुलाबी रंगछटा पसरविणारी उषा त्यांना प्रसन्न करते.
'तू गेल्यावर '.हा विविधतेने नटलेला हळवा व हृदयस्पर्शी काव्यसंग्रह खूपच आवडला.
सौ. कल्पना सोनगडवाला
नाशिक
श्रीमती सुषमाबेन गुजराथी यांचा “तू गेल्यावर…” हा कवितासंग्रह वाचण्यात आला.
जीवनसाथी अकाली सोडून गेल्यावर उर्वरीत आयुष्यातील सर्व जबाबदार्या एकाकी आईने अत्यंत खंबीरपणाने पार पाडतांना ‘त्यांची’ आठवण ह्रुदयाच्या एका कप्प्यात कायमस्वरूपी स्थान धरून असणे साहजिक आहे.अनेक आनंदाच्या क्षणी त्यांचे सोबत नसणे यातून जन्माला आलेल्या कविता यात आहेत.या प्रवासात सासूबाईंची खंबीर साथ लाभल्याने त्यांचे व्यक्तीविशेष ‘धन्य माझी सासू ‘ या कवितेत सरेखरित्या रेखाटले आहे.
स्त्रीजन्मातील आयुष्यातल्या वेगवेगळ्या वळणांवरील विविध भुमिका बजावतांना त्यांच्या भावनांचे प्रकटन सुरेखरित्या कागदावर उतरले आहे.
या भावनाशील कवयित्रीचे निसर्गावरील प्रेमसुद्धा वेगळ्याच उंचीच्या काव्यरूपातून यात अवतरले आहे.
अत्यंत ह्रुदयस्पर्षी कवितासंग्रह “ तू गेल्यावर…” आपल्या संग्रही राहणे नक्कीच आवश्यक !
Sharadchandra Bhalerao
15/07/2022
अत्यंत भावस्पर्शी काव्यरचना जीचे वाचन करणे हा एक मनाला भावणारा असा आनंद आपण विसरू शकत नाही.कवयित्रीने केलेली कविता जणू काही तिच्या मनातील असलेल्या भावनांचे साक्षात चित्रच जणू. सुंदर अन खुपच छान👌👌
Dinesh Songadwala
15/07/2022
आदरणीय सुष्माताईंनी त्यांच्या ह्या अप्रतिम काव्यसंग्रहात खूपच वैविध्यपुर्ण विषयांना हात घातलाय... अगदी माणसाच्या आयुष्यातल्या प्रत्येक नात्यापासून तर प्रचंड पराक्रमी अन् तितकाच हळुवार, नाजूक रंगीबेरंगी उधळण करणाऱ्या निसर्गातील प्रत्येक घटकांवर.... मग, डोंगर दर्यांपासून समुद्रापर्यंत, उन पाऊसापासून सूर्योदय, सूर्यास्तापर्यंत अन् आमवस्येच्या काळरात्रपासून ते पौर्णिमेपर्यंत.....
खरं तर वीस षटकांच्या स्पीड ने मी पूर्ण संग्रह वाचून काढला, पण मग पुन्हा पुन्हा काही एक एक नजाकत भरलेले फटके पुन्हा पुन्हा पाहू लागलो. एक अप्रतिम काव्यसंग्रह...उत्तम मांडणी. डॉ मलोसेंनी उत्तम प्रस्तावना लिहिली आहे.
“तू गेल्यावर” वाचले. अतिशय भावपूर्ण व ह्रदयस्पर्शी कविता संग्रह आहे. निसर्ग कविता खूप सुंदर रचल्या आहेत व स्री व्यक्ती रेखांचे तंतोतंत रेखाटन केले आहे. आवश्य वाचावे.
Dr. Kirti shrimali
14/07/2022
Very nicely written, worth it.
Rashmi Gujarathi
14/07/2022
खूप सुंदर भावस्पर्शी कविता !
Highly recommended, worth to read it.
सगळ्याच कविता अगदी ह्रदयातून कागदावर उमटलेल्या आहेत.
स्त्री व्यक्ती रेखांचे मार्मिक चित्रण केले आहे ,त्याचप्रमाणे निसर्ग कवितांमध्ये निसर्गाची विविध रूपे व आपले जगणे यांचा सुरेख मेळ घातला आहे
हा कविता संग्रह खूप सुरेख वाचनीय आहे
सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा.
सर्व कविता अप्रतिम आहेत कवितेच्या शिर्षकातूनच तुझ्या भावना व्यक्त होत आहेत
Rakesh Shrimali
13/07/2022
Heart touching. Worth reading.
Hrushikesh Gujarathi
13/07/2022
Heart touching cover page. . .
Good book. . .
Savita Gujarathi
13/07/2022
खुप सुंदर काव्यसंग्रह! सगळ्यांनी आवर्जून वाचावे असे भावस्पर्शी लिखाण.
Siddharth Shrimali
07 Dec 2022 05 30 AM
Good book 📖👍
Amita Shroff
07 Dec 2022 05 30 AM
Heart touching…👌👍💐
Manju Dabeer
07 Dec 2022 05 30 AM
खूप सूंदर पुस्तक.speechless.एकदम मनाला भिडणाऱ्या कविता.पुस्तकाचे शिर्षक आणी मुखपृष्ट पण समर्पक.
Neelam S.
07 Dec 2022 05 30 AM
Sunder poetry.. a must read!
Prachi Chhoriya
07 Dec 2022 05 30 AM
Heart touching and a must read!
Sanjay Gujarathi
07 Dec 2022 05 30 AM
Best book...must read
Kumar Gujarathi
07 Dec 2022 05 30 AM
खुपच छान...
Bharti Gujarathi
07 Dec 2022 05 30 AM
Nice book.... heart touching 👏👍
Nandini
07 Dec 2022 05 30 AM
Good book👍
Vedant Gujarathi
07 Dec 2022 05 30 AM
Good book👍
Vrushali Gujarathi
07 Dec 2022 05 30 AM
खुप हृदयस्पर्शी लिखाण....
Swanand Navsarikar
07 Dec 2022 05 30 AM
खूपच छान
Swati gujrathi
07 Dec 2022 05 30 AM
खुप सुंदर कवितासंग्रह ! हृदयाला स्पर्श करणारा ! कवीयत्रीच्या वेदना,दुःख,त्याचा जीवनात तिने केलेला त्या दुःखांचा सामना ! नंतर सुखाचे दिवस आल्यावर आठवलेल्या त्या सगळ्या आठवणी ! सगळे अगदी कवितेच्या रूपाने उमटले आहे ! प्रत्येकाने वाचावा असा कवितासंग्रह !
Amruta Shroff
07 Dec 2022 05 30 AM
❤️
Herat touching...very close to my heart...made me very emotional....
It's amazing
ऋचा मुळे
07 Dec 2022 05 30 AM
The Marathi poerty collection ''तू गेल्यावर'' is a lovely expression of feminine and feminist emotions. The poet Sushma Gujrathi uses beautiful words, and free flowing metreless yet rhythmic form to express the feelings.
Her poems are short and precisely worded. They make a reader think twice before turning the page. The content is powerful and gripping.
There is noticable impact of great poets like Indira Sant, Padma Gole and Nilam Mangaonkar on her poems.
The title is quite apt for the content and cover is tastefully designed and conveys the message beautifully.
The book is definitely a very good read.
Shagun Gujarathi
07 Dec 2022 05 30 AM
Good Book👍
Shrikrishna
07 Dec 2022 05 30 AM
Amazing poetry. Emotions flowing in the form of words. Highly recommended
Nehal
07 Dec 2022 05 30 AM
Heart warming.. deeply touched by the feeling!! Loss is an overwhelming feeling.. the expression of this loss in poems is heartfelt!!
Sayali gujarathi
07 Dec 2022 05 30 AM
Khup ch sunder book.. 👌 must read..👍