Summary of the Book
क्षितिजानी रसिकाला खुणावलं ! गिरीशिखरांनी रसिकाला पुकारलं !खळखळणाऱ्या पाण्याची ,सळसळणाऱ्या गवतपात्यांची ,झुळझुळणाऱ्या वाऱ्याची ,किलबिलणाऱ्या पक्ष्यांची,अहोरात्र गरजणाऱ्या सागर लाटांची ,निसर्गातील साऱ्याच मंजूळ स्वरांची,कानी त्यांच्या पडली साद!
सह्याद्रीच्या कवेतून हिमालयाच्या कुशीत,विसावण्याची त्यांना लागली आस ! त्या झाल्या एक जिप्सी,एक बंजारा ! अंगी संचरला भ्रमंतीचा वारा !
नवा प्रदेश,नवा प्रांत वेगळा देश ,वेगळी संस्कृती केली त्यांनी पादाक्रांत !
लेखणीतून साकारलेलं 'देश-परदेश 'देत आहेत वाचकांच्या हातात! एकच मनोकामना आहे मनात ! पहा ,वाचा आणि व्हा बंजारा! तुमच्यातही संचारूदे भ्रमंतीचा वारा!