Summary of the Book
कथेच्या माध्यमातून चांगला संदेश देणाऱ्या, धार्मिक - नैतिक तत्वांचा प्रसार करणाऱ्या कथा ह. अ. भावे यांनी पुस्तकात दिल्या आहेत.
अर्थातच हे सिंहासन सम्राट विक्रमादित्यांचे आहे. या कथा सांगण्याचीही कथा आहे. कैलास पर्वतावर शंकर-पार्वती बोलत बसलेले असतात.
त्यावेळी सिंहासनाचा विषय निघतो.
सिंहासनाला जडवलेले ३२ पुतळे भोज राजाला कथा सांगता, त्याच कथा शंकर पार्वतीला सांगतो.'विक्रमाचा उदारपणा' या कथेपासून प्रारंभ होतो. अमूल्य रत्ने, काश्मिरातील सरोवर, राक्षसापासून सुटका, योगी आणि शिवलिंग आदी कथा पुस्तकात वाचायला मिळतात. कथांना अनुरूप रेखाचित्रेही पुस्तकात समाविष्ट केली आहेट. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनीच वाचून बोध घ्यावा अशा या कथा.