Summary of the Book
अशोक उजळंबकर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते आणि अभिनेत्री तसेच गायक व गायिका यांच्याबद्दल लिहिलं आहे. दुर्गा खोटे, निम्मी, हेलन, सुरैय्या, उषा किरण आदी अभिनेत्री, तर मुकेश, महंमद रफी या गायकांबरोबरच मदनमोहन, रोशन या संगीतकारांबद्दल त्यांनी इथं लिहिलं आहे. अभिनेत्रींचे चित्रपट, त्यांतील त्यांची भूमिका व त्याचे रसग्रहण अशा स्वरूपाचे हे लेख असून, हिंदी चित्रपटसृष्टीचा मोठा काळ जिवंत करतात. हेमामालिनी आणि रेखा यांच्यावरील लेख माहितीपूर्ण झाले आहेत.