Summary of the Book
सूक्ष्म तपशीलांमधून साकारणार्या आणि एका वेगळ्या वातावरणात नेणार्या सुमेध वडावाला (रिसबूड) यांच्या कथा वाचकांच्या परिचयाच्या आहेत. ‘ब्रह्मकमळ’ कादंबरीत कोकणच्या मातीत रुजलेली परंपरा आणि आधुनिकता यांच्या संधीकालात वावरणारी पात्रे आहेत. राघवच्या आठवणींत रमणार्या वेणू व तुलसीभोवती ती गुंफली असली तरी या तिघांच्यातल्या स्नेहबंधाला अन्य कित्येक कंगोरे आले आहेत ते आक्का, देशपांडे अशा इतर पात्रांमुळे छोट्यामोठ्या तपशिलांनी भरलेल्या प्रतिमांमधून कधी प्रगटपणे तर कधी अस्फुटपणे स्त्री-पुरुष प्रेमाची नाती उत्कट वेदनेसह इथे अनेक पाकळ्यांनी व्यक्त होतात.