Summary of the Book
पं. भास्कर चंदावरकर हे खानदानी सतारवादक होते. उत्तम वक्ते आणि अध्यापक होते. विविध कला, शास्त्रे आणि विचारशाखांचे प्रकांडपंडित होते. प्रतिभाशाली नाट्यसंगीतकार आणि सिनेसंगीतनिर्माते होते. आदिम संगीत, लोकसंगीत आणि कलासंगीत ह्या सर्व संगीतप्रकारांचे त्यांना प्रगाढ ज्ञान होते आणि त्या ज्ञानाचा वापर संगीतनिर्मितीकरता करण्याची क्षमता होती. त्यांचे हे ज्ञान केवळ भारतीय संगीतापुरतेच मर्यादित नव्हते. उत्तर भारतीय आणि कर्नाटकी संगीताच्या विविध शैली, युरोपीय, आफ्रिकन, मध्य पूर्वेतील आणि अतिपूर्वेतील इ. अनेक संस्कृतीतील संगीताचा, वाद्यांचा आणि साहित्यादी अनेक कलांचा त्यांचा गाढा व्यासंग होता. एवढे असूनही त्यांची विद्वत्ता त्यांना डोईजड झाली नव्हती. त्यांच्या अत्यंत तीक्ष्ण विनोदबुद्धीने त्यांच्या विद्वत्तेला जडत्त्वाचा स्पर्शही होऊ दिला नव्हता.
अशा या कलावंताचे सिनेमा आणि संगीत ह्यावरील लेख ‘चित्रभास्कर’ ह्या पुस्तकरूपात मराठीत आले आहेत.