Hard Copy Price:
15% OFF R 125R 106
/ $
1.36
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
निसर्गाच्या गूढरम्य आविष्कारांची भुरळ डॉ. माधव गाडगीळ यांना जन्मजात असावी. वैद्यकशास्त्रशाखेत सहज प्रवेश मिळवून ते रूग्णाचे डॉक्टर झाले असते; पण ते आपल्या देशातील पर्यावरण शास्त्राचे प्रवर्तक झाले.
पन्नासहून अधिक वर्षांपूर्वी अमेरिकेत जीवशास्त्र व संगणकशास्त्राचे प्रगत शिक्षण घेऊनही तिथे न राहता ते मायभूमीला परतले.
देवरायांमध्ये मात्र रमले. कोळी-बेडूक-पाय विरहित केसिलियंत अशा छोट्या प्राण्यांपासून आक्राळ-विक्राळ वाघ, हत्ती या प्राण्याचां त्यांनी जंगलात राहून अभ्यास केला. यामुळे जैवविविधतेच्या अभ्यासाची बैठक बळकट झाली. त्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी सोपे निबंध, तर जाणकारांसाठी जागतिक स्तरावर शोधनिबंध लिहिले.
निसर्गात आढळणारी सुसंवादी, सहकारीवृत्ती मानवी समाजातसुद्धा रुजावी, असे डॉ. गाडगीळांना वाटत असणार. त्यांची सृष्टीदेवतेशी असणारी बांधिलकी वाचकांना थक्क करणारी आहे. विज्ञाननिष्ठ आणि तरीही कविमनाच्या शास्त्रज्ञाचे आवर्जून वाचावे, असे चरित्र.