सध्या सर्वत्र उद्योजकतेचे वातावरण आहे. नोकरीपेक्षा उद्योग - व्यवसायाकडे वळण्याचा सल्लाही अनेकदा दिला जातो. पण हे कसे शक्य होणार, असा प्रश्न पडू शकतो. म्हणूनच मुलांवर लहान वयातच उद्योगाचे संस्कार केल्यास त्यातून कमी वयात उद्योजक निर्माण होऊ शकतो, हा विचार देत विश्वास वाडे यांनी 'उद्योजक संस्कार' मधून छोट्या - छोटे मुद्दे स्पष्ट केले आहेत. उद्योगजकतेची उपयुक्तता, महत्व, माहिती, पाठिंबा, मदत, प्रोत्साहन या गोष्टी यातून मिळतात. गॅझेटमध्ये अडकलेल्या मुलांना फिरायला बाहेर घेऊन जाणे, हा उद्योगजकीय संस्करातील पहिला धडा आहे. यातून मुलांना आभासी जगापेक्षा वास्तवतेचे भान येते, प्रत्यक्ष जगात वावरण्याचे ज्ञान मिळते, आत्मविश्वास वाढतो. या पहिल्या धड्यानंतर मुलांना त्यांच्या चांगल्या कल्पनांवर काम करायला प्रवृत्त करणे, जबाबदारी घ्यायला लावणे, पॉकेट मनी देण्यापेक्षा ते पैसे कमवायला लावणे, पैशाचा बचत व महत्त्व सांगणे, सुटीत छोटे व्यवसाय करायला लावणे आदी ३२ संस्कार यात सांगितले आहेत. हे संस्कार देताना त्यामागील भूमिका, लाभही दिले आहेत. तसेच स्वाध्यायासाठी कोरी जागाही ठेवली आहे.
‘उद्योग संस्कार’ या पुस्तकाचा परिचय वाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर...
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4695490541629118751