Summary of the Book
मानवा,
तू भ्रमात आहेस.
तू म्हणालास, "मी निसर्गाची भाषा शिकून घ्यायला इथं आलोय."
चूक. तू निसर्गाची भाषा शिकून घ्यायला आलेला नाहीस.
तुझ्या मनात भीती आहे.
त्या भीतीचं कारण आहे- तुला स्वतशीच बोलता येत नाही.
तुला स्वतःशी बोलायला शिकायचंय,
तू सोबत मृतदेह आणलाय. तू म्हणतोस,
"ह्या मृतदेहाला पुन्हा जिवंत करायचंय."
मानवा, जेव्हा स्वतःशी बोलायला शिकशील तेव्हाच उमगेल,
तुला मृतदेहाला नाही,
स्वतःला जिवंत करायचंय.
Namita Bangar
09 Apr 2024 05 30 AM
अप्रतिम कादंबरी. सुमेध कुमार ह्यांच्या बुद्धीला सलाम. महामाया निळावंती कादंबरीवर एक मोठा इंग्रजी सिनेमा यावा अशी ईश्वराचरणी प्रार्थना.
Digvijay Joshi (Sunil Medical Pune)
19/05/2024
अशी पुस्तके फक्त इंग्रजी साहित्यात वाचायला मिळतात. आधी कादंबरीचे नाव वाचून खरेदी केले होते. भ्रमनिरास होण्याच्या अपेक्षेनेच वाचायला सुरुवात केली. पण पुस्तकाने बौद्धिक ताकद पणाला लावली. लेखकाच्या ताकदीची जाणीव झाली. कादंबरी खिळवून ठेवणारी आहेच, सोबतच निसर्गाच्या जवळ जाणारी आहे. निसर्गाच्या ठायी असलेल्या अप्राप्य ताकदीचा शोध घेणारी आणि त्यात आस्तिकतेचा शोध घेणारी ही कथा आहे. गेला आठवडाभर ह्या कादंबरीच्या प्रभावाखाली आहे. कादंबरीकार सुमेध ह्यांना सोशलमीडियावर शोधून संपर्क साधला परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. बुकगंगाकडे लेखकाचा संपर्क असल्यास कृपया कमेंटमध्ये टाकावा.
Rajdeep Korlekar
01 Sep 2024 05 30 AM
ह्या लेखकाने लिहिलेले अजून कोणते साहित्य आहे? वाचायला आवडेल. कॉलेज जीवनात सुशिंची पुस्तके वाचायचो. तेवढीच मजा आली.
आयुष्यात वाचलेली ही बेस्ट कादंबरी आहे. (मी मराठी, हिंदी, इंग्रजी, रशियन, फ्रेंच असं बरंच साहित्य वाचलं आहे.) ह्या लेखकाने आंतरराष्ट्रीय पट असलेली कादंबरी लिहायला हवी. महामाया निळावंती भाषांतरित होऊन विविध देशांतही जायला हवी. लेखक सुमेध ह्यांना खूप शुभेच्छा.
सृष्टी विजय राजवाडे
06 Feb 2023 05 30 AM
मराठीतील सर्वोत्कृष्ट कादंबरी. महामाया निळावंती.
लेखक सुमेध मास्टरमाइंड आहेत.
महामाया निळावंती मी आजवर वाचलेली सर्वोतृष्ट कादंबरी आहे. लेखक सुमेध ह्यांची कादंबरी वाचकाच्या बखोटीला धरून अश्या एका मायाजाळात घेऊन जाते जो कप्पा आपल्या मनाला ठावूकही नव्हता. ही कादंबरी माझ्या आयुष्यातली the greatest म्हणावी लागेल. एवढी ओरिजिनल कथा मी आजवर इंग्रजी कादंबर्यातही वाचली नाही.
कृपया सुमेधचा फोन नंबर असेल तर इथे शेअर करावा. लेखक सोशल मिडीयावर मेसेजला रिप्लाय करत नाहीत. ह्या अफलातून पुस्तकाबद्दल माझा फीडback त्यांच्याशी शेअर करायचा आहे.