Hard Copy Price:
25% OFF R 300R 225
/ $
3.21
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीच्या जोखडातून मुक्त केलेला उपेक्षित समाज आज सन्मानाने जगतो आहे. शिक्षण, नोकरी - व्यवसाय यात तो प्रगती करीत आहे. आर. के. जुमळे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची कास धरली आणि खेड्यातील आयुष्य झिडकारून टाकले. ते आज संपन्न जीवन जगत आहेत. हा सर्व प्रवास म्हणजे बाबासाहेबांचे ऋण आहे, असे मानीत त्यांनी ' अशा तुडविल्या काटेरी वाटा 'मधून अनुभव कथन केले आहे. चौधरा गावात लेखकाचे बालपण गेले. दोन डोंगरांमध्ये वसलेल्या गावाचे सौदर्य कथन करतानाच कुठलीही सोई सुविधा नसलेल्याने गावाच्या झालेल्या दुर्दशेचे वर्णनही यात आहे. जातीभेदाने दुभंगलेल्या गावातील समाज, चालीरीती, आई- वडील व भावंडांच्या आपुलकीचे घर, अशिक्षित आईची जागरूकता, घरातील हरहुत्ररी कलाकार, जातीभेदाने उदधवस्थ झालेली घरे, शिक्षणाची ओढ, राजकारणामुळे भावाचे झालेले नुकसान, महाविद्यालयीन जीवन हे यातून उलघडले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात लिपिकपदी नोकरी मिळेपर्यंतच्या आठवणी यात लेखकाने सांगितल्या आहेत.
डाँ.बाबासाहेब अर्थशास्त्री प्रेरणेने प्रेरीत होवुनआंबेडकर चळवळीच्या प्रखर तेजाने ज्यांचा मार्ग प्रकाशमय झाल असे लेखक मा.जुमळे सरांनी आपल्या अशा तुडवल्या काटेरी वाटा ह्या पुस्तकातुन आत्मकथन केलेर्जाती व्यवस्थेचे चटके गरीबी शिक्षणासाठी खाल्लेल्या खस्ता अशा प्रतिकुल परिस्थिति लेखकांनी हिम्मत न हारता धेयाकडे केलेली वाटचाल ही खराेखर काटेरी वाटचाल हाेती तसही काट्यावरुन चालणारी व्यक्ति धेयापर्यंत लवकर पाेहचते कारण रुतणारे काटे पावलांचा वेग वाढवते हेच खरे. बाेलके मुख पृष्ठ ,सुंदर शब्दांकन,ओघवती भाषा, विषयाची पध्दतशिर मांडणी सगळच अप्रतिम .लेखकांनी तर आपल जगण उलगडतांना बारीक सारीक तपशिल आणि प्रसंग जिवंत केले.निरागस पणे व प्रांजळपणे सांगीतलेले प्रसंग खुप भावले .आपल्या प्रतिभा काैशल्याने आठवणींना सुंदर शब्दात साकार केले .वाचक तल्लीन हाेताे उत्कृष्ट लेखन वाचल्याच समाधान हाेत नविन पिढीला हे पुस्तक दीपस्तभ ठरेल .....अभिनंदन
Dr.Lalit Borkar
01 Jun 2019 05 30 AM
नुकतंच 'अशा तुडविल्या काटेरी वाटा' हाती पडलं. काल रात्री १० वाजता पुस्तक चाळू लागलो आणि पहाटेचे साडेतीन कसे वाजले कळलंच नाही. एका बैठकीत वाचून हातावेगळं केलं.
वाचतांना लेखक हेच मुख्य भूमिकेत आहेत हे विसरुन गेलो आणि त्यांचे जागी मीच त्याठिकाणी आहे असे भासले. खेड्यातलं विवंचनेतलं जीवन एवढं सहजसुलभ शब्दात मांडलं की जणू तो आपलाच अनुभव आहे असंच वाटतं होतं. समाजरचनेच्या बाहेर जीवन जगत असतांना खाव्या लागणा-या खस्ता आजच्या संपन्न जीवन जगणाऱ्या पिढीला माहीत होणं गरजेचं आहे.विपन्नता असूनही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श सतत नजरेसमोर ठेवून ध्येयासक्त जीवन जगत तोच आदर्श पुढच्या पिढीला सोपविला आणि ती पिढी देखील चार पावलं पुढेच चालली. हा संघर्षपूर्तीचा आनंद स्वत: अनुभवून घरोघरच्या दुसऱ्या पिढी ला माहीत होण्यासाठी हे आत्मकथन विकत घेऊन वाचणे ही आपलीही जबाबदारी आहे असे मला वाटते.लेखक आयु. रामरावजी जुमळे यांचे अभिनंदन.
Hemant Tirpude
26/12/2018
Truly inspiring !
Dr.Jayant Dudhe
20/12/2018
सदर लिखाण अतिशय हृदयाला हेलावून सोडणारे असुन मनाला खिळवून ठेवणारे आहे. मागील पिढीने अनुभवलेल्या व्यथा आणि खाल्लेल्या खस्ता याचे मूल्यांकन होणे गरजेचे होते.त्याला लेखक जुमळे साहेबांनी निश्चितच न्याय दिलेला आहे. अभिनंदन ।
डॉ. जयंत दुधे
सा. रु. चंद्रपुर
vijay sakharam gawai
17/12/2018
काका अभिनंदन,खुप छान हृदयस्पर्शी आत्मकथा
Anil Gajbhiye
17/12/2018
आत्मकथा फार रोचक व सत्य दर्शन करणारी आहे।कादंबरी शैली वापर केलयाने वाचनीय झाली आहे
लेखकाचे अभिनंदन ।
पी. पी. नील
17/12/2018
गाव खेड्यातील एका गरीब आणी होतकरू मुलाचा शाळा शीकतांना समोर उभ्या ठाकलेल्या अडचनीवर मात करत करत शीक्षण घेणे याचा गोष्टी रूपात वर्णण मनाला भावनारे आहे.
AMIT RAJESH PATODE
16/12/2018
खूपच छान मामाजी
Sanjay Wasnik
16/12/2018
भावस्पर्शी आत्मकथन .... दुसर्या पिढीच्या खेड्यात वाढलेल्या जवळ पास प्रत्येकाच्या वाट्याला आलेल्या बहुतेक घटना ... जिद्द चिकाटी आणी काही तरी करुन दाखवण्याचे ध्येय आणी सामाजीक बांधिलकी सोबतच समाजाला आपलं काही देणे लागते ही भावना ...
अत्यंत मार्मिक ....
chetan patode
15/12/2018
This book always motivate me.....
Nanda patil
15/12/2018
खूपच भावस्पर्शी आत्मकथन! काही प्रसंगात खुदकन हसू येते तर काही प्रसंगात न कळत डोळ्यात पाणी येते.
अमर पातोडे
15/12/2018
खूप छान व प्रेरणादायी आत्मकथा आहेत.
Swapnil fulmali
14/12/2018
खडतर जीवन प्रसंगातून यशस्वी जीवनाकडे वाटचाल ....नक्कीच प्रेरणादायी आहे. एक सुन्दर आत्मकथन ....प्रत्येकाने वाचावं अस पुस्तक आहे.