Summary of the Book
गावाबाहेरच्या टेकडीला लागून आहे गोल्फचं मैदान. निर्जन टेकडीवरील बिळात राहतो आहे एक कोल्हा. गोल्फ खेळणा-या बड्या बड्या लोकांना रोज पाहून एकल कोल्ह्याच्या मनातील महत्वाकांक्षा डोकं वर काढते. आपणही मोठं उद्योजक व्हायचं पण त्यासाठी आधी माणूस व्हायला हवं. मग आईच्या मनाविरुद्ध मंत्राचा वापर करून तो माणूस बनतो....
खूप कष्ट करतो. कामात उन्नती करतो. पण एक दिवस असा येतो की, त्याच्या या महत्वाकांक्षे पायी त्याच्यावर मोठा आघात होतो....
तो उध्वस्त होतो....
व्यापारी करणामुळे मानवी मुल्यांचाच कसा -हास(अवनती) होते हे या प्रतिकारात्मक कथेतून प्रभावीरीत्या सांगितलं आहे.