Home
>
Books
>
पर्यटन
>
Road To Holland (Netherlands) - रोड टू हॉलंड (नेदरलँड्स)
रोड टू हॉलंड (नेदरलँड्स)
ParyatanPuneRoad To Holland (Netherlands)Soham Creations And PublicationTravelingYashwant Deodharपुणेपर्यटनयशवंत देवधररोड टू हॉलंड (नेदरलँड्स)सोहम क्रिएशन्स अँड पब्लिकेशन
Hard Copy Price:
25% OFF R 250R 188
/ $
2.41
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
एका आगळ्यावेगळ्या अशा प्रवासाचे वर्णन जर वाचायचे असेल तर रोड टू हॉलंड हे यशवंत देवधर लिखित व सोहम क्रिएशन या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेले हे पुस्तक जरूर वाचावे. पुस्तक वाचायला सुरुवात करतानाच लेखकाच्या मनस्वी स्वभावाचे दर्शन घडते ते. भारतातील चांगली नोकरी सोडून होलांडला जाण्याचे तो मनावर घेतो, व मग दोन सहकाऱ्यांबरोबर त्याचा प्रवास बोटीने सुरू होतो होतो. पाकिस्तानचा विसा मिळण्याची शक्यता कमी असल्यामुळे इराण पर्यंत प्रवास बोटीने केल्यानंतर मग पुढील सर्व प्रवास हा खुष्कीच्या मार्गाने झालेला आहे. लेखकाच्या बरोबरचे त्याचे दोन मित्र पुढे स्कूटरने प्रवास करणार असतात परंतु स्कूटर बिघडल्यामुळे लेखकाला एकटेच पुढे जावे लागते. पुढे इराण, तुर्कस्तान बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, ऑस्ट्रिया व जर्मनी मार्गे लेखक अखेर हॉलंडमध्ये पोचतो. वाटेत त्याला नानाविध संकटांचा सामना करावा लागतो. ते सर्व वाचत असताना बरेचदा अंगावर काटा येतो. लेखकाच्या या प्रवासाला यंदा पन्नास वर्षे पूर्ण झालेली आहेत व त्या निमित्तानेच लेखकाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. इतके जुने रेफरन्सेस आजच्या काळात उपयुक्त नाहीत पण हे पुस्तक वाचून खूप समाधान होते.