स्वर्गारोहिणी : स्वर्गावर स्वारी
Information Informative Kardaleewan Sewa Sangh Kardalivan Seva Sangh Kshiteej Patukale Kshitij Patukale Mahitipar Prof Kshitij Patukale Prof. Kshiteej Patukale Swarga Rohinee Swargavar Swaree Swarga Rohini Swargavar Swari SwargaRohini SwargaRohini SwargavarSwari कर्दळीवन सेवा संघ क्षितीज पाटुकले प्रा क्षितीज पाटुकले माहितीपर स्वर्गा रोहिणी स्वर्गा रोहिणी स्वर्गावर स्वारी स्वर्गारोहिणी स्वर्गारोहिणी स्वर्गावर स्वारी स्वर्गारोहिणी स्वर्गावरस्वारी
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 400 R 300 / $ 3.85
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
eBook Price: 25% OFF  R 400 R 300 / $ 3.85
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
हिमालयातील म्हणजे देवभूमीतील बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री हे चार धाम प्रत्येक भारतीयाला ऎकून माहिती आहेत. काही जण तेथे जावूनही आलेले आहेत. बद्रीनाथची यात्रा हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न आहे. बद्रीनाथ मंदिराच्या मागे ३९ किमी अंतरावर नर आणि नारायण पर्वतरांगांच्या विळख्यात स्वर्गारोहिणी हे ठिकाण आहे. फार कमी लोकांना याबाबत माहिती आहे. महाभारतामध्ये स्पष्ट उल्लेख आहे कि अवतार समाप्तीच्यावेळी पांडव याच मार्गाने स्वर्गाकडे गेले.

प्रा. क्षितिज पाटुकले यांनी दोन वेळा स्वर्गारोहिणीला प्रत्यक्ष भेट देवून आणि अनेक संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करून “ स्वर्गा रोहिणी : स्वर्गावर स्वारी ” हे पुस्तक लिहले आहे. यात स्वर्गारोहिणीच्या कहाणीबरोबरच तीची परिक्रमा कशी करतात याचे सविस्तर वर्णन केले आहे. याचबरोबर देवभूमी उत्तराखंडातील अनेक अज्ञात ठिकाणांची माहिती दिली आहे. यामध्ये पंच कैलास ( आदि कैलास, मणिमहेश कैलास, श्रीखंड कैलास, किन्नर कैलास आणि कैलास मानसरॊवर) पंच बद्री (वृद्ध बद्री, भविष्य बद्री, योग बद्री, ध्यान बद्री आणि आदि बद्री) पंच केदार (कल्पेश्वर नाथ, रूद्रनाथ, तुंगनाथ, मद महेश्वर नाथ आणि केदारनाथ) पंच प्रयाग (विष्णू प्रयाग, नंद प्रयाग, कर्ण प्रयाग, रूद्र प्रयाग आणि देवप्रयाग) आणि चारधाम व इतर महत्त्वाच्या तीर्थस्थानांची माहिती दिली आहे. याचबरोबर देवभूमीतील ट्रेकिंग आणि माऊंटेनिअरिंग ( विविध जगप्रसिद्ध ट्रेक ) रिव्हर क्रॉसिंग, रिव्हर राफ्टिंग, व्हॅली क्रॉसिंग आणि बर्फावरून घसरण्याचा स्किईंग अशा साहसी खेळांबद्दलही माहिती दिली आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे कैलास मानसरोवर यात्रेची संपूर्ण माहिती आणि मार्ग देतानाच प्राचिन काळातील (चीनने तिबेट गिळून टाकण्यापूर्वी) माणा गावातून आणि नीती व्हॅली घाटीतून कैलास मानसरोवरला जाणाऱ्या दुर्मिळ यात्रा मार्गाची नकाशासह माहिती दिली आहे. भरपूर रंगीत चित्रे, नकाशे याचबरोबर संपर्कासाठी वेबसाईट, मोबाईल आणि दूरध्वनींची अद्ययावत माहिती या पुस्तकामध्ये दिली आहे. हे पुस्तक वाचताना जणू आपण प्रत्यक्ष स्वर्गारोहिणीची परिक्रमा करित आहोत, अशीच अनुभूती येते. प्रत्येकाकडे असलेच पाहिजे असे हे पुस्तक आहे. ज्यांनी कैलास मानसरोवर यात्रा केली आहे त्यांनी तर हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे.
स्वर्गारोहिणीवरील कोणत्याही भाषेतील हे पहिलेच पुस्तक असून हिमालयातील अज्ञात तीर्थस्थाने, ट्रेक्स, पर्यटन स्थळे आणि साहसी खेळांबद्दल माहिती देणारेही हे मराठीतील पहिलेच पुस्तक आहे.
Book Review
Write a review

Jayraj Balaji Kelkar
24 May 2016 12 49 AM

Amazing Book With Outstanding Information
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat