Hard Copy Price:
25% OFF R 600R 450
/ $
6.43
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
व्यक्तिगत आयुष्यात येणाऱ्या अनुभवांची सार्वत्रिक आढळणारी उदाहरणे शोधून त्याचे निरीक्षण करणे आणि त्यातून त्या अनुभवांचे सैद्धांतिकरण करण्याची सिमोनची क्षमता अफाट होती. हे सैद्धांतिकरण करताना तिने कामाची स्वीकारलेली आंतरशाखीय अभ्यासपद्धती देखील विचार करायला लावणारी आहे. या अभ्यास पद्धतीचे महत्व त्यावेळी सर्वात जास्त जाणवते जेव्हा आपण सिमोनचा कालावधी (१९०८-१९८६) लक्षात घेतो. भारतात आंतरशाखीय अभ्यास सुरू झाल्याचे संकेत आत्ता कोठे विद्यापीठात सुरू झालेल्या विभागांच्या निर्मितीवरून मिळतात.
आंतरशाखीय पद्धतीने अभ्यास करण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्या पद्धतीत एखाद्या विषयाचा गुंता उलगडणे शक्य असते. तिच्या याच वैशिष्ट्यामुळे सिमोनच्या लिखाणातील अनुभव हे वाचकाला देखील आपलेच अनुभव असल्याची जाणीव होते. कधीकधी तर ती ज्या पार्श्वभूमीतून (सामाजिक आणि सांस्कृतिक) आली आहे त्यामुळे साहजिकपणे येणाऱ्या मर्यादा देखील नसल्याचा प्रत्यय येतो. हा प्रत्यय येण्याचे महत्वाचे कारण म्हणजे निरीक्षणांना सैद्धांतिकरण देण्याची तिची हातोटी.
कोंडिबा जाधव
16/10/2018
स्त्रियाबद्दलचा आदर वाढवणारा ग्रंथ. प्रत्येक पुरूषाने अवश्य अभ्यासावा.
धन्यवाद - करुणा गोखले. मराठी वाचकांना एक अनमोल खजिना दिल्याबद्दल.
Rajpal
21/11/2016
One is not born but rather becomes a woman.
Life changing book. Buy it read it. Must for all especially for men.