Summary of the Book
वासुदेव मुलाटे यांच्या दोन दीर्घ कथांचा हा संग्रह. मानवी नातेसंबंध आणि आयुष्यात उठणारी वादळे मांडणाऱ्या या दोन कथा. या कथांमधून नियती मानवी आयुष्याला कशी कलाटणी देत असते, त्याचा प्रत्यय येतो. या दोन कथांमध्ये मुलाटे यांनी दोन व्यक्तिरेखा अगदी भिन्न स्वरूपात रेखाटल्या आहेत. वाचकाला अंतर्मुख करण्याची ताकद या दोन कथांमध्ये आहे.