Summary of the Book
हिंदी चित्रपट संगीत कायम प्रवाही राहत आले, बदलत आले आणि म्हणून प्रत्येक पिढीला त्यांची त्यांची नवीन गाणी मिळत राहिली आहेत. गाणी येतात, गाजतात, कानाआड जातात. मात्र, बदलांचे प्रवाह पचवून आजही तेवढेच लोकप्रिय असलेले संगीत ढोबळमानाने १९५० ते १९७५ या पंचवीस वर्षातले!
हजारो वेळा या काळातील गाण्यांवर बोलले गेले, लिहिले गेले असले तरीही कोणी या गाण्यांविषयी, त्यांच्या कर्त्याविषयी नव्याने लिहितो तेव्हा आपण त्याच रसिकतेने वाचतो. ती गाणी आठवतो आणि गुणगुणतोही. पद्माकर पाठकजी यांच्या पुस्तकातील लेख वाचताना तसेच होते.