मधुमती
Desai Ranjeet Fiction Kadambari Madhumatee Madhumati Marathi Fiction Marathi Novel Mehata Publishing House Mehta Publishing House Novel Ranajeet Desai Ranajit Desai Ranjeet Desai Ranjit Desai कथा कादंबरी मधुमती मेहता पब्लिशिंग हाऊस रणजित देसाई
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 140 R 105 / $ 1.80
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
"रणजित देसाई’ यांची लघुकथा सर्वसामान्य मराठी लघुकथेपेक्षा निराळी आहे. अद्‌‌भुतरम्य वातारणात वावरण्याची तिला हौस आहे. निळ्या, सुंदर स्वप्नात ती रंगून गेलेली आहे. तिचे स्वरूप महाराष्ट्रीय असण्यापेक्षा अखिल भारतीय स्वरूपाचे आहे.

वास्तवापेक्षा इतिहास तिला अधिक रुचतो. संगीत व शृंगाराच्या रसात ती नखशिखान्त नाहून निघाली आहे... रसिक मनाची नादि पात्रे त्यांच्या कथेत स्वप्नातल्याप्रमाणे वावरत आहेत. कलेसाठी आणि प्रेमासाठी ती आपले जीवन उद्‌‌ध्वस्त करून घेतात; आणि त्याची मुळीच खंत मानीत नाहीत.

रणजित देसाईंच्या कथांत वावरणार्‍या स्त्रिया रूपवान, नाजूक, कलावंत आणि त्यागी आहेत. नायकीण असो, गाणारी असो वा कुलवती असो, त्यांनी तिच्या स्त्रीमनाचा, तिच्या मृदुलतर भावनांचा आविष्कार करताना आपली लेखणी मुलायमपणे वापरली आहे.

रणजित देसाईंच्या लेखणीत प्रसाद आहे, माधुर्य आहे; वाचकाला रम्य वातावरणात नेऊन वास्तवता विसरावयास लावणारी जादू आहे. आपल्या कथेची पार्श्वभूमीही ते मोठ्या कल्पकतेने, कथेतली स्वप्नमयता वाढावी, अशा तर्‍हेने वापरतात. त्यांच्या अवलोकनशक्तीचे आणि कल्पकतेचे कौतुक करावे, तेवढे थोडेच आहे.

त्यांच्या कथांतील वातावरण वास्तवापेक्षा अद्‌‌भुततेकडे झुकणारे असले, तरी पण त्यातून आकाराला येणार्‍या व्यक्ती मात्र मानवी जगातल्या आहेत. आपल्या सुखात रंगणार्‍या अन् आपल्या दु:खात पिचणार्‍या, त्यांच्या कोमल हृदयाचे त्यांनी केलेले चित्रण इतके जिवंत आणि चटकदार आहे, की ते अवलोकिताना वाचक हसावा नि रडावा...’
Book Review
Write a review

Riya Umesh devji
06 Feb 2024 11 15 PM

I want to read this book
smita
23 Jun 2021 07 42 PM

सुंदर पुस्तक वाचायला मिळेल तर खूप आवडेल...पूर्वी वाचलेले...ताजमहल ही कथा वाचायची आहे
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat