Summary of the Book
महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त गावातील शिक्षकाच्या पोटी जन्मलेल्याने पदवीनंतर नोकरीच्या शोधात मुंबई गाठावी हि झाली चाकोरी ; पण या चाकोरीबद्ध जीवनाला अनपेक्षित कलाटणी देत ऐन पस्तिशीत संघटनेचे काम करण्यासाठी नोकरीवर पाणी सोडून अवाढव्य मुंबईचे नेतृत्व करुन सलग आठ निवडणुका जिंकण्याचा विक्रम करणारे, कर्करोगावर मात करून बोनस आयुष्य जगताना केंद्रीय मंत्री बनून देशभर आपल्या कामाची छाप पडणारे, स्वतःहून निवडणूक संन्यास घेतल्यानंतर वयाच्या ८१ व्या वर्षी देशातल्या सर्वांत मोठ्या राज्याचे - उत्तर प्रदेशचे - राज्यपाल म्हणून आजही दिवसाचे १२ - १२ तास काम करणारे राम नाईक म्हणजे आश्चर्यच !
सलग वर्षभर दैनिक 'सकाळ' मधील सदरातून आपल्या जीवनातल्या आठवणी त्यांनी उलगडल्या. त्याच लेखांचे हे संकलन.