Summary of the Book
येरवडा कारागृहाचे सेवानिवृत्त अधीक्षक जी. के. गोपाळ यांनी अत्यंत ओघवत्या भाषेत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं चरित्र लिहिलं आहे. शिंदे यांच्या उमेदवारीच्या काळापासून ते आजच्या त्यांच्या स्थानापर्यंतचा सारा प्रवास गोपाळ यांनी नेमक्या शब्दांत मांडला आहे. शिंदे यांच्या विविध मुलाखती, त्यांनी लिहिलेले प्रासंगिक लेख इथे दिलेले आहेत. त्याच्यासंदर्भात उमटलेले वाद-विवादांचा वेध या पुस्तकात घेण्यात आला आहे.