Summary of the Book
मंगेश तेंडुलकर
व्यंगचित्रकार, नाट्यसमीक्षक, अभिनेता.
लेखक, दिग्दर्शक आणि समाजव्रती कार्यकर्ताही !
व्यंगचित्रांना शब्दविरहित भाषा म्हणून
'साहित्यिक' वळण देणारा हा मनस्वी कलाकार
आयुष्यभराच्या संघर्षयात्रेचाही प्रवासी आहे.
हा मुलगा जगणार नाही- हे होतं ज्योतिष्याच भाकीत
हा काहीच करू शकणार नाही- हे होतं शाळेचं प्रमाणपत्र
ह्या व्रात्य मुलाचं कसं होईल- ही होती वडिलांची धास्ती
आणि हा पोर वटवृक्षाच्या पारंब्यांसारखा पसरत जाईल-
ही आईची अशक्य वाटावी अशी खात्री !
आयुष्यानं दिलेल्या नाकारांचे होकार करणाऱ्या
तेंडूलकरांच्या भावजीवनाची आणि कलाजीवनाची ही आहे,
'तेंडुलकरी' स्ट्रोक्समधून साकारलेली 'रंगरेषा व्यंगरेषा' !
ही जीवनकहाणी कधी हसवते,
कधी अस्वस्थ करते, कधी अवाक् करते
आणि अखेरीस अंतर्मुख करते.