नागवेल
Pages: 314
Weight: 389 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789353461096

Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 425 R 318 / $ 4.54
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
‘नागवेल’ ही कादंबरी म्हणजे ज्ञानेश्वर नावाच्या एका हुशार तरुणाची गोष्ट आहे. खूप अभ्यास करून नाव कमवायचे आणि मराठी साहित्याची आवड जोपासायची, अशी त्याची इच्छा असते; पण रोजीरोटीसाठी त्याला त्याच्या भावोजींना मदत करावी लागते आणि त्यासाठी त्याला पानवाला बनावे लागते.
दारिद्र्याचे दशावतार तो पाहत/भोगत असतो; त्यातून बाहेर पडून एका चांगल्या संस्थेत उत्तम वेतन असलेला प्राध्यापक बनायचे स्वप्न तो नेहमी पाहत असे. त्याच्यासारख्याच अत्यंत गरीब तरुणांच्या आयुष्यात बदल घडवायची आणि त्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देण्याची त्याची इच्छा होती. ही कल्पना त्याला कॉलेजमधील त्याचे लाडके प्राध्यापक सोनटक्के यांच्याकडे पाहून सुचली होती. प्रा. सोनटक्के यांची शिकवण्याची पद्धत अशी होती, की सगळे विद्यार्थी अगदी मंत्रमुग्ध होऊन जात. ज्ञानेश्वरच्या जीवनात त्यांचे स्थान महत्त्वाचे होते.
तशीच आणखी एक व्यक्तीही ज्ञानेश्वरच्या आयुष्यात विशेष महत्त्वाची होती, ती म्हणजे सविता - त्याचे प्रेम. कॉलेजमध्ये असताना सविता त्याच्या वर्गात होती. त्यांची अनेक वर्षांची मैत्री खुलत जाऊन तिचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले होते; पण ही कादंबरी म्हणजे प्रेमकथा नाही. ही अशा एका मुलाच्या संघर्षाची गोष्ट आहे, की जो अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत असूनही तो खूप मोठा होण्याच्या स्वप्नाचा पाठलाग करत होता. सध्याची शिक्षणव्यवस्था भ्रष्टाचार आणि वशिलेबाजीने ग्रासलेली आहे. अशा स्थितीतही तो स्वतःचे स्वतंत्र स्थान मिळवण्यासाठी झगडत होता.
त्याने सुवर्णपदक मिळविले होते; पण त्याच्या खिशात दमडीही नव्हती. अशा स्थितीत पाच हजार रुपये मानधनाच्या पुढे त्याची प्रगती होईल का? दोघांच्या आर्थिक परिस्थितीत असलेली प्रचंड दरी पाहता तो सविताशी लग्न करू शकेल का? त्याचे मित्र हा नेहमीच त्याचा मोठा आधारस्तंभ होता; पण असे आणखी कोणी होते का, की जे त्याचा हा संघर्ष/धडपड पाहत होते आणि त्याला मदत करू इच्छित होते? तो त्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो का? की त्याला पुन्हा पानवालाच बनावे लागते? या प्रश्नांच्या उत्तरासाठी ‘नागवेल’ ही कादंबरी वाचायलाच हवी.
प्रा. नवनीत देशमुख यांची ‘नागवेल’ ही कादंबरी वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवते. ही कादंबरी म्हणजे केवळ मनोरंजन नाही, तर ती वाचकांच्या मनाला हात घालणारी आणि स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देणारी गोष्ट आहे.

‘नागवेल’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4627835542093688281
Book Review
Write a review

Akshay Choraghe
13/08/2021

average book
Navnath Jagtap
02 Aug 2019 05 30 AM

Very Good Review in Sakal Paper Today. Best Wishes to Author. Keep it up
Avinash Borkar
30/01/2019

The book is amazing. The story is very interesting and real. The author has narrated the story of a common man in a very beautiful way. It mandates us to think about present education system in India. While reading we feel as if we are watching a movie and every character comes alive. We also remembered our college days. The poems are so meaningful. Overall the book is very interesting, beautiful narrated and having excellent story. I recommend this book for all readers.
प्रफुल्ल महाकाळकर
01 Sep 2019 05 30 AM

नागवेल वाचन माझ्यासाठी एक अद्भुत अनूभव होता आमचे मित्र प्रा राहुल राऊत यांच्या प्रयत्नाने ही कलाकृती गवसली सदर कादंबरी वाचकाला त्याची स्वतःची वाटते प्राध्यापक व त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या वेगवेगळ्या अनुभवातून माणसाचं जडण घडण कशी होते याचा परिपाक या कलाकृती तुन येतो प्रत्येक वाचकाने एकदा जरूर वाचावी अशी कादंबरी म्हणजे नागवेल। प्रा देशमुख सरांना खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा .....
Vinay
01 Sep 2019 05 30 AM

खरंच खुप खुप छान झालीये कादंबरी कोणीही वाचली तरी आपलीच स्टोरी वाटावी ईतकी real ... सगळ्यांना त्यांच्या college च्या आठवणी आठवतील ही कादंबरी वाचताना ती शेवटची कविता तर एकदम 👌👌 एका शिक्षणावर प्रेम करणार्या हाडाच्या शिक्षकाची पण नव्याने ओळख झाली
Archana Gayakwad
01 Sep 2019 05 30 AM

हे पुस्तक मी दोन दिवसात वाचून काढले. लेखक प्रा. नवनीत देशमुख यांची शैली खूप सहज आणि सुंदर असून मनाला भिडणारी आहे. वाचताना प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो हे विशेष. वाचतांना प्रत्येक वेळेस वाटत होतं की मी मराठीतून चेतन भगतच वाचते आहे की काय !! या कादंबरीतला नायक ज्ञानेश्वर ह्याची ही कथा खूप प्रोत्साहित करणारी आहे.आणि खुप काही शिकवून जाणारी आहे. I highly recommend this book.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat